मुंबई World Sparrow Day 2024 : स्पॅरो डे हा 20 मार्च रोजी साजरा केला जातो. भारतात आणि जगभरात चिमण्यांंची संख्या सातत्यानं कमी होत आहे. चिमणी ही पृथ्वीवरील सर्वात सर्वात जुन्या पक्षीच्या प्रजातींपैकी एक आहे. जागतिक चिमणी दिन साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना चिमण्यांच्या संवर्धनाची जाणीव करून देणे हा आहे. चिमण्यांचे संरक्षण करणे खूप महत्वाचे आहे, कारण त्या इको सिस्टीम आणि अन्नसाखळीतील महत्त्वाचा भाग आहे. किडींपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी चिमणी ही महत्वाची भूमिका बजावते. लुप्त होत चाललेल्या चिमण्या कमी होण्याचे कारण शहरांच्या वाढत्या व्याप्तीमुळे पक्की घरे, गगनचुंबी इमारती आणि त्यांच्या प्रजननाची जागा हिसकावून घेतल्यानं होत आहे.
जागतिक चिमणी दिन : शेतकऱ्यांकडून शेतीसाठी खते आणि कीटकनाशकांचा वापर केल्यानं चिमण्यांच्या अन्नावर विपरीत परिणाम होतो , त्यामुळे त्यांचा मृत्यू होतो. औद्योगिक क्षेत्रातून पसरणारी विषारी हवा आणि घातक रासायनिक प्रदूषित पाण्यामुळे चिमण्यांच्या अस्तित्वाला गंभीर धोका निर्माण झाला आहे आणि त्यामुळे त्यांची संख्या झपाट्यानं किमी होत आहे. चिमण्या शहरी लोकवस्तीजवळ आढळतात. एक काळ होता जेव्हा चिमण्यांच्या किलबिलाटानं लोकांना जाग येत असे, पण आता तसं राहिलं नाही.
चिमण्यांचे करा संरक्षण : काहीजण आता उन्हाळ्यामध्ये घराच्या दारात शेकडो चिमण्यांसाठी घरटी तयार करतात. शेकडो पक्षी धान्य खाण्यासाठी आणि पाणी पिण्यासाठी येतात. नेचर फॉरएव्हर सोसायटी (इंडिया) आणि इको-सिस ऍक्शन फाउंडेशन (फ्रान्स) यांच्या संयुक्त विद्यमानं दरवर्षी 20 मार्च रोजी जागतिक स्पॅरो डे साजरा केला जातो. नाशिकचे रहिवासी मोहम्मद दिलावर यांनी चिमणी पक्ष्यांच्या लुप्त होत चाललेल्या प्रजातींना मदत करण्यासाठी ‘नेचर फॉरएव्हर सोसायटी’ (NFS) ची स्थापना करून याची सुरुवात केली. नेचर फॉरएव्हर सोसायटीनं दरवर्षी 20 मार्च रोजी 'जागतिक स्पॅरो डे' साजरा करण्याची योजना आखली. हा दिवस 2010 मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला.
अशाप्रकारे चिमण्या वाचवा
तुमच्या घरात चिमणी घरटे बनवत असेल तर ते मोडू नका.
उन्हाळ्यात चिमण्यांसाठी पाणी ठेवा.
चिमण्यासाठी तुम्ही बाजारातून कृत्रिम घरटी विकत घेऊ शकता.
अंगण, खिडक्या, बाहेरील भिंतींवर धान्य आणि पाणी रोज ठेवा.
हेही वाचा :