ETV Bharat / bharat

जागतिक पासवर्ड दिन 2024 ; जाणून घ्या जागतिक पासवर्ड दिनाचं महत्व आणि इतिहास - world Password day - WORLD PASSWORD DAY

world Password day : सध्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात खासगी माहिती हॅक करुन मोठ्या प्रमाणात फसवणूक वाढली आहे. मात्र त्यासाठी आपल्या खासगी सोशल माध्यमांच्या खात्याचा पासवर्ड मजबूत असणं गरजेचं आहे. आपल्या पासवर्डबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक पासवर्ड दिन मे महिन्याच्या पहिल्या गुरुवारी साजरा करण्यात येतो.

world Password day
संग्रहित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 2, 2024, 8:03 AM IST

हैदराबाद world Password day : दरवर्षी मे महिन्याच्या पहिल्या गुरुवारी जागतिक पासवर्ड दिवस साजरा करण्यात येतो. यावर्षी 2 मे रोजी जागतिक पासवर्ड दिवस साजरा करण्यात येत आहे. खासगी माहिती आणि आर्थिक माहितीचं संरक्षण करण्यासाठी पासवर्ड हा महत्वाचा असतो. त्यामुळे पासवर्ड वापरण्याचं महत्त्व स्पष्ट करण्यासाठी जागतिक पासवर्ड दिन साजरा करण्यात येतो. पासवर्डमुळे आपली खासगी माहिती सुरक्षित ठेऊ शकते. त्यामुळे पासवर्डला अनन्यसाधारण महत्व आहे. महत्त्वाचं सोशल माध्यमातील अकाऊंट सुरक्षित ठेवण्यासाठी आपण मजबूत पासवर्ड सेट केला पाहिजे.

काय आहे जागतिक पासवर्ड दिनाचा इतिहास : सध्या माहिती आणि तंत्रज्ञानाचं युग आहे. त्यामुळे आपली खासगी माहिती सुरक्षित ठेवणं ही मोठी जबाबदारी नागरिकांवर येऊन ठेपली आहे. त्यासाठी आपल्या सोशल माध्यमांचा पासवर्ड सुरक्षित ठेवायला हवा. यासाठी जनजागृती करण्यासाठी करण्यासाठी सुरक्षा संशोधक मार्क बर्नेट यांनी जागतिक पासवर्ड दिनाची संकल्पना मांडली. मार्क बर्नेटनं प्रथम आपल्या Perfect Passwords या पुस्तकात नागरिकांना 'पासवर्ड डे' साजरा करण्यास प्रोत्साहन दिलं. सुरक्षा संशोधक मार्क बर्नेट यांनी 2005 मध्येच "प्रत्येकानं पासवर्ड बदलल्यावर 'पासवर्ड डे' साजरा केला पाहिजे," असं नमूद केलं. मे महिन्याच्या पहिल्या गुरुवारी जागतिक पासवर्ड दिन घोषित करण्यात आला. मात्र 2013 मध्ये प्रथमच जागतिक पासवर्ड डे साजरा करण्यात आला. तेव्हापासून जागतिक पासवर्ड डे हा मे महिन्याच्या पहिल्या गुरुवारी साजरा करण्यात येत आहे.

हॅकिंग टाळण्यासाठी हवा मजबूत पासवर्ड : सध्या हॅकींगकरुन अनेक नागरिकांना फसवण्याच्या घटना घडत आहे. त्यातही सायबर क्राईम वाढल्यानं नागरिकांना आपल्या पासवर्डची काळजी घेणं गरजेचं बनलं आहे. पासवर्डमुळे आपलं सोशल मीडिया अकाऊंट, बँक खातं आणि खासगी माहिती संरक्षित करण्यास मदत होते. हॅकिंग टाळण्यासाठी मजबूत पासवर्ड सेट करणं आणि तो वारंवार बदलणं महत्त्वाचं आहे. त्यामुळेच जागतिक पासवर्ड दिनाची माहिती आपण इतरांना द्यावी, यासाठी मार्क बर्नेट यांनी आपल्या पुस्तकात बऱ्याच गोष्टींचा उल्लेख केला आहे.

काय आहे जागतिक पासवर्ड दिनाचं महत्त्व : माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात नागरिकांची खासगी माहिती हॅक करुन फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे जागतिक पासवर्ड दिनाचं महत्व वाढलं आहे. इंटेलनं शेअर केलेल्या डेटानुसार सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या 10 हजारपेक्षा जास्त पासवर्ड 98 टक्के खात्यांमध्ये प्रवेश करण्याची परवानगी देतात. यावरुन नागरिक त्यांच्या ऑनलाइन खात्यांचं संरक्षण करण्यासाठी पुरेशी खबरदारी घेत नसल्याचं स्पष्ट होत आहे. जागतिक पासवर्ड दिनी पासवर्डच्या महत्त्वाचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे आपल्याकडं स्ट्राँग पासवर्ड असल्याची खात्री करा, आपला पासवर्ड नियमितपणे अपडेट करा त्यासह सोशल माध्यमातील खात्यांचं संरक्षण करण्यासाठी मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरणं योग्य असल्याचं दिसून येते.

हेही वाचा :

  1. आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस 2024 : सांस्कृतिक चळवळीला चालना देणारा आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस, जाणून घ्या इतिहास आणि महत्व - International Dance Day 2024
  2. महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन एकाच दिवशी साजरा होण्याचा ऐतिहासिक योगायोग - Labour Day 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.