ETV Bharat / bharat

तुम्हाला 'ही' लक्षणं आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या! कारण अशू शकतो 'मंकीपॉक्स' - Monkeypox Symptoms - MONKEYPOX SYMPTOMS

Monkeypox Symptoms नुकतेच कोरोनाच्या थैमानानं संपूर्ण जग दहशतीत होतं. त्याच्या जखमा ताज्या असतानाच परत एका साथीनं दार ठोठावलं आहे. ते आहे मंकीपॉक्स. सध्या आफ्रिकन देशांमध्ये हा साथीचा आजार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. काय आहे हा आजार? कसा पसरतो? याची लक्षणे काय? जाणून घेऊयात.

Monkeypox Symptoms
मंकीपॉक्स (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Health Team

Published : Aug 20, 2024, 1:49 PM IST

हैदराबाद Monkeypox Symptoms : कोरोनाच्या विखाळ्यातून सावरतानाच आता आणखी एका महामारीनं तोंड वरती केलं आहे. आफ्रिकेच्या मध्यभागी पसरलेला मंकीपॉक्स आता पाकिस्तानात दाखल झालाय. तसंच युरोप खंडातील स्वीडनमध्ये पहिलं प्रकरण आढळून आलं आहे. या संदर्भात जागतिक आरोग्य संघटनेनं मंकीपॉक्सवर आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे.

मंकीपॉक्स म्हणजे काय? मंकीपॉक्स हा विषाणूजन्य आजार आहे. या आजाराची तीव्रता लक्षात घेता केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं देखील सूचना जारी केल्या आहेत. हा आजार ओर्थोपोक्स या डीएनए प्रकारच्या विषाणूमुळे होतो. तसंच खारी आणि उंदरांमध्ये देखील हा विषाणू आढळतो. हा विषाणू मुख्यता मध्य आणि पश्चिम आफ्रिकेत आढळला आहे. 1958 मध्ये माकडांमध्ये हा विषाणू पहिल्यांदा आढळला होता. त्यामुळे त्याला मंकीपॉक्स असं नाव पडलं.

मुलांसाठी धोकादायक : इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नॅशनल कोविड 19 टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. राजीव जयदेवन यांच्या मते, नवीन स्ट्रेन क्लेड 1बी मध्ये मृत्यूचा धोका जास्त आहे. हा आतापर्यतचा सर्वात धोकादायक प्रकार आहे. क्लेड 1बीचा मृत्यू दर पौढांमध्ये 5 टक्के आणि मुलांमध्ये 10 टक्के आहे. नवीन क्लेड लैंगिक संपर्काशिवाय देखील पुरुष आणि महिलांवर परिणाम करु शकतो. गर्भवती आणि वृद्धांसाठी हा आजार धोकादायक आहे.

प्रथम मानवी प्रकरण कधी आढळलं : सन 1970 मध्ये, मानवाला प्रथमतः या रोगाची लागण झाली. हे मुख्यतः दुर्गम खेड्यांमध्ये विशेषतः उष्णकटिबंधीय आफ्रिकन देशांमध्ये आढळलं. त्यामुळे जगभरातील शास्त्रज्ञ आणि आरोग्य विभागांचं त्याकडे दुर्लक्ष झालं. परिणामी 2022 मध्ये प्रथमच मंकीपॉक्सची प्रकरणे जगभर मोठ्या प्रमाणावर दिसून आली. २०२२ मध्ये भारतात मंकीपॉक्सचे रुग्ण आढळून आले. यामुळे WHO ने आंतरराष्ट्रीय आणीबाणीची स्थिती घोषित केली आहे.

मंकीपॉक्सचे किती प्रकार आहेत? क्लेड-1 (काँगो बेसिन क्लेड) आणि क्लेड-2 (पश्चिम आफ्रिकन क्लेड) या दोन प्रकारांमध्ये मंकिपॅाक्सचं वर्गीकरण केलं जातं. यामध्ये क्लेड-१ मुळं आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होतात. न्यूमोनिया, जिवाणू संसर्ग आणि श्वसनाच्या समस्या देखील होतात. मृत्यू दर 1-10% आहे. क्लेड-2 हे काहीसं कमी धोकादायक आहे. अंगावर फोड येणे, ताप येणे अशी लक्षणं दिसतात. मृत्यू दर 1 टक्क्यांपेक्षा कमी आहे.

मंकीपॉक्स कसा पसरतो? मंकीपॉक्स थेट संपर्काद्वारे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरतो. शरीर द्रव, लैंगिक संपर्क, जखम किंवा इतर स्रावामुळे लागण होण्याची शक्यता असते. तज्ज्ञांच्या मते, संक्रमित व्यक्तीनं वापरलेल्या कपड्यांमार्फत तसंच जास्त वेळ संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात राहिल्यास श्वसन मार्गातून बाहेर पडणाऱ्या मोठ्या थेंबावाटे दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होऊ शकतो. क्लेड-1 आयबी प्रकार सध्या जगभरात वेगानं पसरत आहे. लैंगिक संबंधांमुळे हा प्रकार झपाट्याने पसरत आहे, असे तज्ज्ञांच म्हणणं आहे.

मंकीपॉक्स न होण्यासाठी काय काळजी घ्यावी?

हात नियमित साबणाने स्वच्छ धुवावेत.

संयशिय मंकीपॉक्स रुग्णास विलगिकरण कक्षात ठेवावं.

रुग्णांच्या कपड्यांशी संपर्क येऊ देवू नये.

मंकीपॉक्ससारखे दिसणारे पुरळ असलेल्या लोकांकडे जाणं टाळा.

मंकीपॉक्स आणि कोरोनामध्ये फरक : जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, मंकीपॉक्स हा कोरोनासारखा विषाणूप्रमाणे पसरणारा संसर्गजन्य आजार आहे. यामुळे वेदनादायक पुरळ, लिम्फ नोट्स वाढणे आणि ताप येवू शकतो. हा आजार देखील कोविडसारखा प्राणघातक नाही.

हेही वाचा

  1. सावधान! कंबरेचं घेर वाढत आहे तर तुम्हालाही अशू शकतो मधुमेह टाइप 2 - Diabetes Type 2
  2. गॅसच्या समस्येनं त्रस्त आहात का? आरोग्यातील 'या' बदलानं समस्येतून होईल सुटका - Stomach Gastric Problem

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचकांसाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा. )

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.