कोलकात्ता West Bengal Building Collapse - पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्तामध्ये पाच मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणं कोसळली. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला. तर १० जणांना सुरक्षितपणं वाचविण्यात यश आलं आहे. इमारतीजवळ राहणाऱ्या झोपडीतील रहिवाशीदेखील जखमी झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
हजारी मोल्ला बागान येथे असलेली पाच मजली इमारत मध्यरात्री कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. दुर्घटनेत वाचलेल्या लोकांना उपचाराला नेण्याकरिता मदतकार्य करण्यात येत आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही लोक अडकले असावेत, अशी भीती व्यक्त होत आहे. एका पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री गार्डन रीच परिसरात बांधकाम सुरू असलेली इमारत अचानक कोसळली आहे. आम्ही काही लोकांना वाचविलं आहे. अजून मदतकार्य सुरू आहे. घटनास्थळी रुग्णवाहिका तैनात करण्यात आली आहे.
-
#WATCH | West Bengal CM Mamata Banerjee says, "... Rescue work was started immediately after the accident. Two people have died, 5-6 people are still trapped inside, they will also be rescued soon. Officials from medical, fire and other departments are deployed. The building was… pic.twitter.com/ExUv1nxkbS
— ANI (@ANI) March 18, 2024
मदत करण्याचं विरोधी पक्षनेत्यांचं आवाहन- स्थानिक नागरिकाच्या माहितीनुसार इमारत कोसळण्यापूर्वी काँक्रिटचे तुकडे पडले. इमारत कोसळण्याचा आवाज झाला. धुळींचे ढग जमा झाल्यानंतर अनेकांना त्रास झाला. इमारतीचा ढिगारा शेजारी असलेल्या झोपड्यांवर कोसळले आहेत. बांधकाम सुरू असल्यानं इमारतीत कोणीही राहत नव्हते. मात्र, शेजारील झोपड्यांमध्ये काही नागरिक राहत होते. ते इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकण्याची भीती आहे. पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी म्हणाले," लोकांना सुरक्षित वाचविण्याकरिता आपत्कालीन पथकाची मदत घेण्यात यावी. त्याबाबत मी पश्चिम बंगालचे गृह सचिव, कोलकात्ताचे पोलीस आयुक्त यांच्याकडं आग्रह करत आहे. दुर्घटना झाल्यानंतर मला फोन आले. कृपया घटनास्थळी अग्नीशमन दल अथवा पोलिसांचे पथक पाठवून पीडितांना वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत."
- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक्स सोशल मीडियावर पोस्ट करत जखमींवर उपचार केले जाणार असल्यांच म्हटलंय. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं, "आम्ही संकटात सापडलेल्या कुटुंबांसोबत आहोत."
जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करा-पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या दुर्घटनास्थळी पोहोचल्या आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, " इमारतीच्या दुर्घटनेनंतर तातडीनं बचावकार्य सुरू करण्यात आलं. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अद्याप 5 ते ६ लोक अडकले आहेत. त्यांनाही लवकरच बाहेर काढण्यात येणार आहे. घटनास्थळी वैद्यकीय, अग्निशमन आणि इतर विभागांचे अधिकारी आहेत. प्रशासनाकडून इमारत बांधण्यासाठी परवानगी दिली नसताना बांधकाम सुरू होते. दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले असून जबाबदार असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल. दुर्घटनेतील मृतांचे वारस आणि जखमींच्या कुटुंबीयांना राज्य सरकार मदत करणार आहे. इमारत कोसळल्यानंतर आजूबाजूच्या लोकांच्या घरांचेही नुकसान झाले आहे. त्या पीडितांनाही सरकार मदत करणार असल्याचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितलं.
हेही वाचा-