ETV Bharat / bharat

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्नानं अखेर त्यांच्या साखरपुड्याच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया - अफवांवर दिली प्रतिक्रिया

Vijay React To His Engagement Rumours : अभिनेता विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांचा साखरपुडा होणार असल्याची अफवा पसरण्यात आली होती. मात्र आता या अफवांवर विजय आणि रश्मिकानं प्रतिक्रिया दिली आहेत.

Vijay React To His Engagement Rumours
विजयनं साखरपुड्याच्या अफवांवर प्रतिक्रिया दिल्या
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 20, 2024, 11:02 AM IST

मुंबई Vijay React To His Engagement Rumours : अभिनेता विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांच्याबद्दल अशी चर्चा होती की दोघंही लवकरच साखरपुडा करणार आहेत. दरम्यान या अफवांवर विजय देवरकोंडानं प्रतिक्रिया दिली आहे. रश्मिका आणि विजय यांनी त्यांच्या नात्याबद्दल मौन बाळगले होते. आता त्यांच्या साखरपुड्याच्या बातम्यांवर विजय आणि रश्मिकानं मौन सोडलं आहे. त्यांनी या अफवांचे पूर्णपणे खंडन केलं आहे. एका मुलाखतीत विजयनं सांगितलं की, ''मी फेब्रुवारीमध्ये साखरपुडा किंवा लग्न करणार नाही. मीडियाच्या लोकांना दर दोन वर्षांनी माझं लग्न करायचं आहे. मी दरवर्षी माझ्याबद्दल अशा बातम्या ऐकतो. सर्वजण माझ्या लग्नाची वाट पाहत आहेत.''

रश्मिकासोबत विजयची मालदीवमध्ये सुट्टी : नुकतेच विजय देवरकोंडा आणि रश्मिका मालदीवमध्ये व्हेकेशनदरम्यान एन्जॉय करताना दिसले होते. दोघांनीही त्यांचे सिंगल फोटो सोशल मीडियावर शेअर केले असले, तरी चाहत्यांनी त्यांची चोरी पकडली होती. रश्मिकानं विजयच्या सनग्लासेसमधील काही फोटो शेअर केले होते, ज्यामुळे त्यांच्या गुप्त सहलीचा खुलासा झाला होता. विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांनी 'गीता गोविंदम' आणि 'डियर कॉम्रेड' या दोन चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 'गीता गोविंदम' या चित्रपटामधील या दोघांची केमिस्ट्री अनेकांना पसंत पडली होती. या दोघांची जोडी चाहत्यांना आवडते.

वर्कफ्रंट : विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर,विजय हा 'कुशी' या चित्रपटामध्ये समांथा रुथ प्रभूसोबत दिसला होता. हा चित्रपट हिट झाला होता. आता पुढं तो, 'जेजीएम जन गण मन', 'फॅमिली स्टार', 'व्हीडी 12' (तात्पुरते शीर्षक असलेल्या चित्रपट)मध्ये दिसणार आहे. दुसरीकडं रश्मिका मंदान्ना ही शेवटी 'अ‍ॅनिमल' चित्रपटामध्ये रणबीर कपूरसोबत दिसली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट झाला. आता यानंतर ती 'पुष्पा 2'मध्ये अल्लू अर्जुनसोबत झळकणार आहे. याशिवाय पुढं ती 'द गर्लफ्रेंड', 'छावा', 'डी51' (तात्पुरते शीर्षक असलेल्या चित्रपट) या चित्रपटामध्ये दिसेल.

हेही वाचा :

  1. सुहाना खानने पार पाडले बहिणीचं कर्तव्य! छोट्या भावासाठी बनली चीअरलीडर
  2. 'फायटर'च्या ट्रेलरवर पाकिस्तानी सेलिब्रिटींची टीका, सिद्धार्थ आनंदने दिले प्रत्युत्तर
  3. अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी जॅकी श्रॉफने साफ केले मुंबईतील सर्वात जुने राम मंदिर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.