Hug Day 2024 : सध्या व्हॅलेंटाइन वीक सुरू आहे. व्हॅलेंटाइन वीकची (Valentine Week) खासयितच काही वेगळी असते. 'हग डे'ला प्रेमी युगुल एकमेकांना मिठी मारून आपलं प्रेम व्यक्त करतात. तुमच्या प्रिय व्यक्तीची नाराजी दूर करायची असेल तर त्याला मिठी मारा. त्यामुळं तुमचं नातं अजून घट्ट होईल. आपण मित्र, कुटुंब, नातेवाईक आणि जोडीदाराला मिठी मारू शकतो. मिठी मारणं म्हणजे एकप्रकारे विश्वास देणं, आपलं प्रेम स्पर्शातून व्यक्त करणं. दोघांमध्ये सामंजस्य निर्माण करण्याचा आणि प्रेम वाढवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.
- मूड चांगला राहतो : मिठी मारल्यानं तुमचा मूड फ्रेश राहतो. वास्तविक, जेव्हा तुम्ही एखाद्याला मिठी मारता तेव्हा तुमचा मेंदू जास्त सेरोटोनिन हार्मोन तयार करतो. ज्यामुळं तुमचा मूड चांगला राहतो. याशिवाय मिठी मारल्यानंतर दिवसभर काम करण्याची क्षमताही वाढते.
- तणाव दूर होतो : तुमच्या खास व्यक्तीला मिठी मारल्यानं स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोलची पातळी कमी होते. मिठी मारल्यानं तणाव दूर होतो. तसेच व्यक्तीची स्मरणशक्तीही तीक्ष्ण होते. म्हणून जर तुम्हाला आयुष्यात ताण जाणवत असेल तर तुमच्या प्रिय व्यक्तीला मिठी मारा.
- मानसिक आरोग्य चांगलं राहतं : जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला अनेकदा मिठी मारली किंवा तो तुम्हाला नेहमी मिठी मारत असेल तर, तुम्ही दोघेही प्रत्येक परिस्थितीत एकमेकांना संभाळून घेता असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळं तुमचं मानसिक स्वास्थ्य चांगलं राहतं.
- हृदयासाठी फायदेशीर : मिठी मारल्याने शरीरात लव्ह हार्मोन ऑक्सीटोसिनची पातळी वाढते. यामुळं हृदय निरोगी राहते. एवढेच नाही तर मिठी मारल्यानं रक्तदाबही कमी होतो. त्यामुळं जे लोक अनेकदा आपल्या जोडीदाराला मिठी मारतात, त्यांचा रक्तदाब नियंत्रणात राहतो.
- विश्वास वाढतो : मिठी मारल्यानं विश्वास वाढतो. समोरच्या व्यक्तीला सुरक्षित वाटते. मिठीमुळे लोकांच्या मनातील विश्वास दृढ होतो आणि त्यामुळं एकमेकांमधील नातेही घट्ट होते.
हेही वाचा -