Valentine Week List 2024 : फेब्रुवारी महिना म्हणजे प्रेमाचा उत्साहाचा महिना. व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाचा दिवस मानला जातो. जगभरातील प्रेमी आणि विवाहित जोडपी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात. प्रेमाला सीमा नसते, ना प्रेम जाहीर करण्यासाठी कुठल्या मर्यादा. त्यामुळं हा प्रेमाचा उत्सव जोरात साजरा करण्यासाठी व्हॅलेंटाइ वीक 2024 ची जोरदार तयारी सुरु आहे. बहुतेक देशांमध्ये व्हॅलेंटाईन्स डे साजरा केला जातो.

रोझ डे 2024 - 7 फेब्रुवारी (Rose Day) : व्हॅलेंटाइन वीकला 7 फेब्रुवारीपासून म्हणजे बुधवारी सुरुवात होणार आहे. पहिला डे असतो तो म्हणजे रोज डे. प्रेमाचं प्रतिक म्हणजे गुलाबाचं फुलं. या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीला लाल गुलाब दिलं जातं. कपल्स त्यांचं प्रेम व्यक्त करण्यासाठी एकमेकांना गुलाबाचे फुल देतात.

प्रपोज डे 2024 - 8 फेब्रुवारी (Propose day) : रोझ डे नंतर प्रपोज डे येतो. या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीजवळ आपल्या मनातील प्रेम व्यक्त करण्याचा दिवस. आजकाल मार्केटमध्ये प्रपोज डेसाठी अनेक मेसेज आणि प्रेम व्यक्त करण्यासाठीचे कार्ड मिळतात. अनेक जण या दिवसाला खास करण्यासाठी वेगवेगळ्या आयडिया शोधून काढतात. तुम्ही डिनर डेट प्लॅन करू शकता.

चॉकलेट डे 2024 - 9 फेब्रुवारी (Chocolate Day) : व्हॅलेंटाईन वीकचा तिसरा दिवस म्हणजे चॉकलेट डे. चॉकलेट डेच्या निमित्ताने 'कुछ मीठा हो जाये'ची कल्पना करू शकता. तुमची काळजी असलेल्या व्यक्तीसोबत चॉकलेट शेअर केल्यानं तुमचं नातं मजबूत होऊ शकतं. जेव्हा तुम्ही तुमच्या प्रियकराला चॉकलेटचा एक मोठा बॉक्स किंवा चॉकलेटचा एक तुकडा प्रेमाने शेअर करता तेव्हा ते तुमच्या विचारशीलतेची प्रशंसा करतील.

टेडी डे 2024- 10 फेब्रुवारी (Teddy Day) : व्हॅलेंटाईन वीकच्या चौथ्या दिवशी म्हणजे टेडी डे. झोपण्याच्या वेळेचा उत्तम साथीदार म्हणजे टेडी बिअर. ज्याला तुम्ही घेवून झोपू शकता. हे तुमच्या जोडीदाराची तुमच्याबद्दलची आपुलकी आणि काळजी दर्शवते. तुम्ही त्याच्या मिठीचा आनंद लुटता.

प्राॅमीस डे 2024 - 11 फेब्रुवारी (Promise Day) : व्हॅलेंटाईन वीकचा पाचवा दिवस प्रत्येक जोडप्यासाठी खास असतो. कारण यादिवशी एकमेकांना प्रेमाचे वचन देण्याचा दिवस असतो. तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला जे हवे आहे ते दिले पाहिजे. प्रॉमिस डे हा तुमच्या जोडीदारासोबत सर्व प्रकारचे करार करण्याची वेळ आहे.

हग डे 2024 - 12 फेब्रुवारी (Hug Day) : व्हॅलेंटाईन वीकचा सहावा दिवस म्हणजे हग डे. या दिवशी प्रेमळ जोडपे एकमेकांना मिठी मारून आपलं प्रेम व्यक्त करतात. यातून ते एकमेकांबद्दलची आपुलकी आणि जिव्हाळा व्यक्त करतात. हग डे ही तुमच्या जोडीदाराच्या जवळ जाण्याची संधी आहे.

किस डे 2024 - 13 फेब्रुवारी (Kiss Day) व्हॅलेंटाईन वीकच्या सातव्या दिवशी किस डे साजरा केला जातो. या दिवशी जोडपे एकमेकांवरील प्रेम व्यक्त करतात. किस डेचा उद्देश आपले नाते अधिक दृढ करणं आहे. किस हे वचनबद्धतेचे आणि आत्मीयतेचे लक्षण आहे. ते आपुलकीचा संवाद साधण्यासाठी वापरले जातात. ते तुमच्या नात्यातील बंध मजबूत करतात.

व्हॅलेंटाईन डे 2024 - 14 फेब्रुवारी (Valentine’s Day) या वीकचा शेवटचा आणि महत्त्वाचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे. या वीकची सांगता करण्याचा दिवस प्रेमी जोडपे हा दिवस खूप खासप्रकारे साजरा करतात. हा दिवस खास करण्यासाठी अनेक दिवसांपासून प्लॅन केले जातात. एकमेकांना खास भेटवस्तू दिल्या जातात. वर्षातील सर्वात रोमँटिक दिवस असतो. हा एक प्रणय आणि प्रेमाने भरलेला दिवस आहे. या दिवशी तुमच्या प्रियकरासाठी भेटवस्तू खरेदी करणे किंवा रोमँटिक जेवण आणि सहलीचे आयोजन करू शकता. अशाप्रकारे हा प्रेमाचा महिना साजरा केला जातो.
गुलाबाचे रंग काय संदेश देतात? :
- लाल गुलाब - प्रेम व्यक्त करणे
- गुलाबी गुलाब - मैत्री मजबूत करणे
- पिवळा गुलाब - मैत्रीसाठी
- केशरी रंगाचा गुलाब - तुमच्या मनात काय आहे ते समोरच्याला सांगण्यासाठी
- पांढरा गुलाब - एखाद्याला पटवून द्यायचे असेल तर
हेही वाचा -