ETV Bharat / bharat

उत्तराखंड हादरले! धावत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीवर 2 कंडक्टरसह 2 चालकांकडून सामूहिक बलात्कार - Dehradun Gang Rape Case - DEHRADUN GANG RAPE CASE

Dehradun Gang Rape Case : उत्तराखंडची राजधानी डेहराडूनमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. बस रिकामी झाल्यानंतर 5 जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यात त्यात दोन बस चालक, दोन कंडक्टर आणि कॅशियरचा समावेश आहे.

Dehradun Gang Rape Case
अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार (Source - Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 18, 2024, 5:48 PM IST

डेहराडून Dehradun Gang Rape Case : कोलकाता येथे महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून हत्या केल्यानंतर डेहराडूनमधून एक धक्कादायक घटना समोर आलीय. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून डेहराडूनला आलेल्या पंजाबमधील एका पीडितेवर आयएसबीटी रोडवेजच्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करण्यात आला. ही घटना 13 ऑगस्ट रोजी सकाळच्या दरम्यान घडली. याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. तसंच आयएसबीटी कॅम्पसमधून काही लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे.

पोलिसांची प्रतिक्रिया (Source - ETV Bharat Reporter)

पोलिसांची प्रतिक्रिया : डेहराडूनचे एसएसपी अजय सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबची रहिवाशी असलेली पीडित मुलगी ही मुरादाबादहून यूपी रोडवेजच्या बसमध्ये पुढील प्रवासाठी बसली होती. ती 13 ऑगस्ट रोजी पहाटे 2 वाजता आयएसबीटी डेहराडूनला पोहोचली. प्रवासी उतरल्यावर मुलगी बसमध्ये एकटी असताना पाच नराधमांनी तिच्यावर बसमध्ये सामूहिक बलात्कार केला. यानंतर आरोपींनी मुलीला बसमधून उतरवले. तिला तेथेच सोडून निघून गेले. बाल कल्याण समितीच्या बचाव पथकाला ही मुलगी दुर्दशेत आढळली. बाल कल्याण समितीच्या टीमनं मुलीचं नाव, पत्ता व इतर माहिती घेतली असता तिनं काहीही सांगितलं नाही. मात्र, काही वेळानं तिनं बसमध्ये अत्याचार झाल्याचे सांगितलं. प्रकरणाचं गांभीर्य पाहून चाइल्ड हेल्पलाइन टीमनं मुलीला बालिका निकेतन येथं नेऊन तिचं समुपदेशन केलं. गेली चार दिवस बालिका निकेतनमध्ये पीडितेचं समुपदेशन सुरू होतं.

पाच जणांनी केला बलात्कार केला : ही पीडित मुलगी मुरादाबादहून दिल्लीला निघून काश्मिरी गेट येथं फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यादरम्यान उत्तराखंडच्या एका कंत्राटी बसच्या चालकानं तिला दमदाटी करत डेहराडूनला आणलं होत. डेहराडूनमध्ये बस रिकामी झाल्यानंतर चालक आणि कंडक्टरने वर्कशॉपमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. हे दोघेही कंत्राटी कामगार होते. त्यानंतर दुसऱ्या रोडवेज बसचा चालक आणि कंडक्टरला ही बाब समजल्यानंतर त्या दोघांनीही मुलीवर बलात्कार केला. एवढंच नाही तर रोडवेज कॅशियरला ही बाब कळताच त्यानंही मुलीवर बलात्कार केला.

सामूहिक बलात्कारात सहभागी असलेल्या आरोपींची नावं

  • धर्मेंद्र कुमार (वय 32 वर्षे), रा. बुग्गावाला, हरिद्वार
  • देवेंद्र कुमार (वय 52 वर्षे), रा. भगवानपूर, हरिद्वार
  • रवी कुमार (वय 34 वर्षे) रा. नवाबगंज, फारुखाबाद (उत्तर प्रदेश)
  • राजपाल (वय 57 वर्षे), रा. बुग्गावाला, हरिद्वार
  • राजेश कुमार (वय 38 वर्षे) रा. माजरा, डेहराडून

आरोपींना अटक : शनिवारी रात्री बालकल्याण समितीच्या सदस्यांनी आयएसबीटी पोस्ट गाठून मुलीसोबत घडलेल्या घटनेची माहिती दिली. यानंतर एसएसपी अजय सिंह यांच्या सूचनेवरून पोलिस ठाण्यात 5 अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू ठेवला. जवळपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. पोलिसांनी पाचही आरोपींना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता, मुलगी मुरादाबाद (उत्तर प्रदेश) येथील रहिवासी असल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांना डेहराडूनला बोलावलं. त्याचवेळी मुलगी मानसिक आजारी असल्याचं तिच्या कुटुंबीयांनी सांगितलं. सामूहिक बलात्कार झालेल्या बस तपासासाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) कडे पाठवण्यात आली आहे.

हेही वाचा

  1. "आयएएसचे खासगीकरण ही आरक्षण...", यूपीएससीमधील लॅटरल एन्ट्रीवरून राहुल गांधींचा मोदींवर निशाणा - upsc recruitment 2024
  2. केंद्रानं घेतली डॉक्टर संघटना संपाची दखल; कायदा आणि सुव्यवस्थेचा अहवाल प्रत्येक दोन तासाला द्या - गृह मंत्रालय - Kolkata Doctor Rape Murder Case
  3. डॉक्टर बलात्कार खून प्रकरण ; पीडितेच्या पालकांचा इंटर्न डॉक्टरांवर गंभीर आरोप, संशयितांची नावं दिल्यानं खळबळ - Kolkata Doctor Murder Case

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.