ETV Bharat / bharat

भाविकांवर काळाचा घाला : भरधाव टेम्पो ट्रॅव्हलर नदीत कोसळून 14 भाविक ठार, 12 गंभीर - Road Accident On Badrinath Highway - ROAD ACCIDENT ON BADRINATH HIGHWAY

Road Accident On Badrinath Highway : रुद्रप्रयागमध्ये बद्रीनाथ महामार्गावर टेम्पो ट्रॅव्हलर नदीत कोसळून 14 भाविकांचा मृत्यू झाला. या अपघातात 12भाविक गंभीर जखमी झाले.

Road Accident On Badrinath Highway
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 15, 2024, 1:18 PM IST

Updated : Jun 15, 2024, 8:33 PM IST

देहराडून Road Accident On Badrinath Highway : टेम्पो ट्रॅव्हलर अलकनंदा नदीत कोसळून तब्बल 14 भाविकांचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना बद्रीनाथ महामार्गावर रेंटोलीजवळ घडली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात 12 भाविक गंभीर जखमी झाले. या अपघाताला पोलीस अधीक्षक विशाखा अशोक भदाणे यांनी दुजोरा दिला असून बचावकार्य सुरू असल्याचं सांगितलं.

टेम्पो ट्रॅव्हल्स नियंत्रित होऊन कोसळला नदीत : बद्रीनाथ महामार्गावर रेंटोलीजवळ असलेल्या वळणावर भरधाव वेगात असलेला टेम्पो ट्रॅव्हलर अलकनंदा नदीत कोसळला. त्यामुळे टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये बसलेले तब्बल 14 भाविकांचा मृत्यू झाला. तर 12 भाविक गंभीर जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या भाविकांचा टेम्पो ट्रॅव्हलर रुद्रप्रयाग इथल्या रेंटोलीजवळून जात असताना चालकाचं नियंत्रण सुटून टेम्पो ट्रॅव्हलर थेट अलकनंदा नदीत कोसळला. त्यामुळे भाविकांना टेम्पो ट्रॅव्हलरच्या बाहेर पडता आलं नाही.

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी व्यक्त केला शोक : रुद्रप्रयाग इथं बद्रीनाथ महामार्गावर झालेल्या अपघातात तब्बल 14 भाविकांचा मृत्यू झाला. या अपघाताबाबत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी शोक व्यक्त केला. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी सोशल मीडियावर लिहिलं की, "रुद्रप्रयागमध्ये टेम्पो ट्रॅव्हलरच्या अपघाताची अत्यंत वेदनादायक बातमी मिळाली. स्थानिक प्रशासन आणि एसडीआरएफचं पथक मदत आणि बचाव कार्यात गुंतलं आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या वैद्यकीय केंद्रात पाठवण्यात आलं आहे. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मृतांच्या आत्म्याला ईश्वर शांती देवो आणि शोकाकुल कुटुंबीयांना हे अपार दु:ख सहन करण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थना मी बाबा केदारनाथ यांना करतो."

हेही वाचा :

  1. ट्रकनं रिक्षाला चिरडलं; परराज्यात कामासाठी निघालेल्या 5 मजुरांवर काळाचा घाला, 8 गंभीर - Road accident in Garhwa
  2. मेळघाटात खासगी बसला अपघात, दहा प्रवासी गंभीर जखमी - Private bus Accident in Melghat
  3. खराब हवामानामुळे ट्रेकिंगसाठी गेलेल्या 8 ट्रॅकर्सचा मृत्यू; 8 जणांच्या सुटकेकरिता बचावकार्य सुरू - Sahastra Tal Trek Accident

Last Updated : Jun 15, 2024, 8:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.