लखनऊ UP ATS Arrest : उत्तर प्रदेश एटीएसनं रशियातील मॉस्को येथील भारतीय दूतावासात तैनात सत्येंद्र सिवाल याला अटक केलीय. सत्येंद्र हा आयएसआयचा एजंट म्हणून काम करत होता. एटीएसच्या एडीजीनं सांगितलं की, सत्येंद्र हा 2021 पासून रशियातील भारतीय दूतावासात भारतातील सर्वोत्तम सुरक्षा सहाय्यक IBSA म्हणून तैनात आहे.
चौकशीत अनेक खुलासे : एटीएसच्या एडीजीनं याप्रकरणी सांगितलं की, शहामहिउद्दीनपूर, हापूर येथील रहिवासी एजंट सत्येंद्र सेवाल यानं भारतीय दूतावास, संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय सैन्यदलाच्या आस्थापनांची महत्त्वाची गोपनीय माहिती आयएसआय हँडलर्सना दिलीय. आयएसआय एजंटच्या नुकत्याच झालेल्या अटकेनंतर तपासात सत्येंद्रची माहिती मिळाली. त्यानंतर एटीएसच्या मेरठ युनिटनं सत्येंद्रला मेरठ कार्यालयात चौकशीसाठी बोलावलं. या चौकशीत त्यानं कबुली दिलीय. चौकशी दरम्यान एटीएसच्या पथकानं त्याच्याकडून दोन मोबाईल फोन, आधार कार्ड, पॅनकार्ड आणि इतर काही वस्तू जप्त केल्या आहेत.
काय म्हणाले एडीजी : याविषयी एडीजी मोहित अग्रवाल यांनी सांगितलं की, 'सत्येंद्र आयएसआयच्या संपर्कात आला. त्यांच्यासाठी काम करण्याच्या बदल्यात त्याला मोठी रक्कम दिली जाते. या लोभापोटी तो सीमेपलीकडील सर्व गोपनीय माहिती पाकिस्तानला पाठवत आहे. एटीएस आता सत्येंद्रच्या साथीदारांची माहिती गोळा करत आहे. आयएसआयनं दूतावासात आणखी अनेक एजंट नेमले असावेत, असा संशय असल्याचं त्यांनी सांगितलंय.
- यापुर्वी अनेकांना अटक : यूपी एटीएसनं पश्चिम उत्तर प्रदेशातील अनेक संशयितांना अटक केलीय. ते आयएसआय किंवा पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होते. गेल्या वर्षीच यूपी एटीएसनं पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या संशयावरुन हापूर आणि गाझियाबाद इथून दोघांना अटक केली होती. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुलीही दिली होती.
हेही वाचा :