नवी दिल्ली Union Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून देशाचा अर्थसंकल्प सादर केलाय. यावर्षीही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी महिला वर्ग आणि तरुणांसाठी महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. महिलांना संसदेत आरक्षण देण्यासाठी कायदा आणणार आहोत. पीएम आवास योजनेतील ७० टक्के घरं महिलांना देण्यात येणार आहेत, अशी घोषणाही अर्थमंत्र्यांनी यावेळी केली.
अर्थसंकल्पातील घोषणा : तरुणांना बळ देण्याचं काम मोदी सरकार करत आहे. तसंच 25 कोटी लोकांना गरिबीच्या खाईतून बाहेर काढलं असल्याचंही अर्थमंत्री निर्मला सीतारमण यावेळी म्हणाल्या. 'जय जवान, जय किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान' या पंतप्रधान मोदींची घोषणेनुसार काम सुरू आहे. तसंच प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आणखी दोन कोटी घरं बांधली जाणार असल्याची घोषणाही अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली. तिहेरी तलाक प्रथा बंद केली आहे. यासोबतच महिलांना संसदेत आरक्षण देण्यासाठी कायदा आणणार आहोत. पीएम आवास योजनेतील ७० टक्के घरं महिलांना देण्यात येणार आहेत, अशी घोषणाही अर्थमंत्र्यांनी यावेळी केली.
अर्थव्यवस्थेत सकारात्मक बदल : अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना सांगितले की, "गेल्या 10 वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेत सकारात्मक बदल झाले आहेत. भारतातील लोक आशा आणि पर्यायांसह भविष्याकडे पाहत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं समावेशाच्या सर्व बाबींची काळजी घेतली आहे."
तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : "संरचनात्मक सुधारणा, लोकाभिमुख कार्यक्रम आणि रोजगाराच्या संधींमुळं अर्थव्यवस्थेला नवे बळ मिळण्यास मदत झाली. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये अर्थव्यवस्थेत 5.8 टक्के घसरण झाल्यानंतर, 2021-22 मध्ये आम्ही 9.1 टक्के वाढ नोंदवली. अर्थ मंत्रालयानं आपल्या ताज्या मासिक आर्थिक आढाव्यात म्हटले आहे की, भारतीय अर्थव्यवस्था पुढील तीन वर्षांत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल आणि सध्याच्या $3.7 ट्रिलियन वरून $5 ट्रिलियनचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) होईल," अशी घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली.
गरिबी हटवण्याचं काम : पंतप्रधान 'जन धन योजने'अंतर्गत आदिवासी समाजापर्यंत पोहोचायचंय. यामुळं पायाभूत सुविधांच्या विकासाला गती येमार आहे. सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचत आहेत. सरकार गरिबी हटवण्याचंही काम करत आहे. सरकारनं ग्रामीण विकासाच्या योजना राबवण्यात आल्या आहेत. पाणी योजनेतून प्रत्येक घरापर्यंत पाणीपुरवठा केला जात आहे. ७८ लाख पथारी व्यावसायिकांना मदत देण्यात आली आहे, असंही निर्मला सीतारमण यांनी सांगितले.
शेतकऱ्यांसाठी विविध घोषणा : शेतकऱ्यांना सक्षम करण्यावर भर देण्यात आलाय. ४ कोटी शेतकऱ्यांना पीएम पीक विमा योजनेचा लाभ देण्यात आलाय. पंतप्रधान किसान योजनेतून ११.८ कोटी लोकांना आर्थिक मदत मिळाली आहे. सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तरुणांच्या सक्षमीकरणावरही काम केले जात आहे. तीन हजार नवीन आयटीआय उघडण्यात आल्या आहेत. ५४ लाख तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय तरुणांनी घवघवीत यश संपादन केले, असंही निर्मला सीतारमण यांनी अधोरेखित केलंय.
हेही वाचा -