नवी दिल्ली PM Surya Ghar Muft Bijli Yojana : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये मोफत वीज देण्याच्या घोषणेची सर्वाधिक चर्चा होत आहे. 'पीएम सूर्यघर मोफत वीज योजने'च्या लाभार्थ्यांसाठी अर्थमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. यामध्ये एक कोटी कुटुंबांना दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार आहे.
देशातील प्रत्येक घरात वीज : अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, "पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेंतर्गत छतावर सौर पॅनेल बसवण्यात येणार आहेत. यामुळं एक कोटी कुटुंबांना दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळू शकेल. पीरपेंटी येथे 21,400 कोटी रुपये खर्चून 2400 मेगावॅटचा नवीन ऊर्जा प्रकल्प उभारण्यासह ऊर्जा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत." देशातील प्रत्येक घरात वीज पोहोचवणे हा या योजनेचा उद्देश असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं.
केंद्रीय बजट 2024-25 के प्रस्ताव:
— Ministry of Finance (@FinMinIndia) July 23, 2024
✅ पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना के तहत 1.28 करोड़ से अधिक पंजीकरण और 14 लाख आवेदन प्राप्त हुए
✅ बिजली भंडारण और समग्र ऊर्जा मिश्रण में #RenewableEnergy के सुचारु एकीकरण के लिए पंप स्टोरेज नीति लाई जाएगी
✅ एयूएससी प्रौद्योगिकी का उपयोग… pic.twitter.com/0aNv6jo2Rz
पीएम सूर्य घर मोफत वीज योजना काय आहे? : पीएम सूर्य घर मोफत वीज योजना हा 2024 चा एक महत्त्वाचा उपक्रम आहे जो भारत सरकारने सुरू केला आहे. या योजनेचा मुख्य उद्देश हरित ऊर्जेला प्रोत्साहन देणं आणि पर्यावरण संरक्षणास प्रोत्साहन देणं, तसेच लोकांना वीज बिलाच्या ओझ्यातून दिलासा देणं हा आहे. याअंतर्गत सरकार लोकांना सोलर पॅनल बसवण्यासाठी सबसिडी देत. सोलर पॅनलच्या किमतीच्या 40 टक्के रक्कम सरकार देते.
मोफत वीज कोणाला मिळणार? : पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेंतर्गत एक कोटी लोकांनी नोंदणी केली आहे. या योजनेचा लाभ अशा कुटुंबांना मिळेल ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे.
PTI INFOGRAPHIC | Union Budget 2024: Highlights of Finance Minister Nirmala Sitharaman's (@nsitharaman) budget speech in Lok Sabha (n/30) #Budget2024WithPTI #Budget2024 pic.twitter.com/lWSyQp9IZr
— Press Trust of India (@PTI_News) July 23, 2024
ग्रामीण विकासासाठी 2.66 लाख कोटी : "ग्रामविकासासाठी 2.66 लाख कोटी रुपयांची घोषणा केली आहे. ग्रामविकास आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी याचा उपयोग केला जाणार आहे. पंतप्रधान निवास योजनेअंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागामध्ये ३ कोटी घरे बांधण्यात येतील. अनेक गावांची लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळं अशा गावांमध्ये रस्ते बांधणीचं काम हाती घेण्यात आलं. अशा 25 हजार गावांसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचा चौथा टप्पा राबवला जाणार आहे. त्यामुळं प्रत्येक गावात पक्का रस्ता पोहोचेल आणि लोकांना सुविधा मिळायला लागतील. असं अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या.
हेही वाचा
- केंद्रीय अर्थसंकल्प 2024; सरकारला पाठिंबा दिल्याचा गिफ्ट; अर्थसंकल्पातून बिहारला मोठं गिफ्ट, रस्ते बांधणीसाठी 26 हजार कोटींचा निधी - Union Budget 2024
- देशातील महिलांच्या विकासाला वाव देणारा अर्थसंकल्प- ज्योती दोशी - Union Budget 2024
- अर्थसंकल्पात युवकांसाठी खुशखबर:पाच वर्षात 4.1 कोटी तरुणांना रोजगाराच्या संधी - India Budget 2024