ETV Bharat / bharat

उज्जैनच्या महाकाल मंदिरात भस्म आरतीवेळी गाभाऱ्यात आग, पुजाऱ्यांसह 14 जण जखमी - Ujjain Mahakal mandir Fire - UJJAIN MAHAKAL MANDIR FIRE

Ujjain Mahakal mandir Fire : उज्जैनच्या महाकाल मंदिरात आज सकाळी आग लागली. या आगीत 14 जण जखमी झाले आहेत. उज्जैनच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

उज्जैनच्या महाकाल मंदिरात भस्म आरतीवेळी गाभाऱ्यात आग, अनेक जण जखमी

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 25, 2024, 8:29 AM IST

Updated : Mar 25, 2024, 10:03 AM IST

उज्जैनच्या महाकाल मंदिरात भस्म आरतीवेळी गाभाऱ्यात आग

उज्जैन Ujjain Mahakal mandir Fire : आज होळीच्या दिवशी येथील जगप्रसिद्ध महाकाल मंदिरात मोठी दुर्घटना घडली. भस्म आरतीच्या वेळी गाभाऱ्यात अचानक आग लागली. यात पुजाऱ्यांसह 14 जण जखमी झाले आहेत. सुदैवानं या आगीवर वेळीच नियंत्रण मिळवलं. आगीचा लाईव्ह व्हिडिओदेखील समोर आला आहे. जिल्हाधिकारी नीरज कुमार सिंह यांनी याप्रकरणी तपासाचे आदेश दिले आहेत. सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दिव्यावर रंग पडल्यानं आग लागली : मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी महाकाल मंदिरात होळीचा उत्सव सुरू होता. यावेळी शेकडो लोक एकमेकांवर रंग टाकत होते. बाबा महाकालच्या भस्म आरतीदरम्यान आरतीच्या ताटावर रंग पडला. त्यानंतर अचानक आग लागली, त्यामुळं मंदिरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. गाभाऱ्यात उपस्थित पुजारी आगीत होरपळले. त्यांना तातडीनं जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तिथं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

14 जण जखमी : या आगीत पुजाऱ्यांसह 14 जण जखमी झाले आहेत. 14 जखमींपैकी 9 जणांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना इंदौर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या घटनेची माहिती मिळताच उज्जैनचे आयजी संतोष कुमार सिंह, आयुक्त संजय गुप्ता आणि जिल्हाधिकारी नीरज कुमार सिंह हे जखमींची प्रकृती जाणून घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात पोहोचले.

जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे दिले आदेश : जिल्हाधिकारी नीरज कुमार सिंह म्हणाले, "मंदिरात होळी खेळली जात होती. गर्भगृहात कापूर वापरुन आरती केली जात होती. त्यावेळी कापूरची आग भडकली. या घटनेत जखमी झालेल्या लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तपास पथकातील एडीएम अनुकल जैन, एडीएम मृणाल मीना लवकरच अहवाल सादर करणार आहे. आग गुलालामुळं लागली की आग लागण्यामागं आणखी काही कारण आहे, हे अहवालानंतर कळेल. मंदिरातील दर्शन व्यवस्था सुरळीत सुरू आहे.

हेही वाचा :

  1. अमरावतीच्या मेळघाटात रंगली 'मिडनाईट होळी'; मध्यरात्री नाचगाण्याबरोबर लग्न जुळवण्याचीही आहे परंपरा - Midnight Holi in Melghat
  2. गोदान एक्सप्रेसच्या दोन बोगींना भीषण आग; नाशिकरोड रेल्वे स्थानकातील घटना - Godan Express Two Bogies Fire

Last Updated : Mar 25, 2024, 10:03 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.