ETV Bharat / bharat

धक्कादायक! लोहरदगामध्ये दोन अल्पवयीन मुलींवर 11 जणांकडून सामूहिक बलात्कार, आरोपींना अटक - अल्पवयीन मुलींवर बलात्कार

Gang rape in Lohardaga : झारखंडमधल्या लोहरदगा जिल्ह्यात दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सर्व 11 आरोपींना ताब्यात घेतलं असून यापैकी तीन आरोपी अल्पवयीन आहेत.

two minor girls raped by 11 people in lohardaga
धक्कादायक! लोहरदगामध्ये दोन अल्पवयीन मुलींवर 11 जणांकडून बलात्कार, आरोपींना अटक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 25, 2024, 10:43 PM IST

उपविभागीय पोलीस अधिकारी श्रद्धा केरकेट्टा

रांची Gang Rape in Lohardaga : लोहरदगा जिल्ह्यात दोन अल्पवयीन मुलींवर 11 जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. जिल्ह्यातील बागडू पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून या प्रकरणी 11 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसंच याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

बर्थडे पार्टीतून घरी परतत असताना घडली घटना : बागडू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गावातील रहिवासी असलेल्या तीन अल्पवयीन मुली शनिवारी (24 फेब्रुवारी) सेन्हा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कांद्रा येथे त्यांच्या एका मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेल्या होत्या. वाढदिवस साजरा करुन रात्री उशिरा त्या तिघी आपल्या घरी परतत होत्या. त्या तिघींपैकी एक मुलगी आपल्या घरी चालल्या गेली. तर इतर दोघी बागडू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ओळखीच्या व्यक्तीकडं थांबल्या. शनिवारी रात्री उशिरा 11 जण तेथे आले, त्यापैकी तिघं अल्पवयीन होते. सर्व 11 जणांनी मिळून दोन्ही अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार केला. यानंतर पीडित मुलींनी बागडू पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली.

सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात : उपविभागीय पोलीस अधिकारी श्रद्धा केरकेट्टा यांच्या सूचनेवरून बागडू पोलीस स्टेशन प्रभारी यांनी तातडीनं कारवाई करत सर्व 11 आरोपींना अटक केली. त्यानंतर यातील तिघं अल्पवयीन असल्याची बाब समोर आली. अटक करण्यात आलेले आरोपी हे बागडू, भुषाड आणि गंगुपार गावचे रहिवासी असून, पोलीस या सर्वांची चौकशी करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळं परिसरात एकच खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. या घटनेला उपविभागीय पोलीस अधिकारी श्रद्धा केरकेट्टा यांनी दुजोरा दिला असून पोलीस याप्रकरणी पुढील कारवाई करत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

हेही वाचा -

  1. अश्लील फोटो पसरवण्याची धमकी देऊन शाळकरी मुलीवर बलात्कार; गुन्हा दाखल होताच आरोपीची आत्महत्या
  2. दोन अल्पवयीन मुलींवर प्रार्थनास्थळात बलात्कार; चॉकलेटचं आमिष दाखवून केला अत्याचार, आरोपींना अटक
  3. सोशल मीडियावर ओळख: तरुणासोबत नाईट आऊटला गेलेल्या तरुणीवर नराधमाचा अत्याचार, पोस्ट शेअर करुन मागितला न्याय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.