नवी दिल्ली Election Commissioner Appointment : अनुपचंद्र पांडे हे काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयुक्त पदावरुन सेवानिवृत्त झाले होते. तर दुसरे निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी शनिवारी (9 मार्च) राजीनामा दिला होता. गोयल यांच्या राजीनाम्यानं राजकीय वातावरणही तापलं होतं. गोयल यांच्या राजीनाम्यामुळं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे भारतीय निवडणूक आयोगाचे (ECI) एकमेव सदस्य म्हणून काम पाहत आहेत. त्यामुळं १५ मार्चपर्यंत दोन निवडणूक आयुक्तांच्या रिक्त जागा भरण्यासाठी समिती स्थापन करण्यात आलीय. यामध्ये प्रत्येकी पाच नावांचे दोन पॅनल तयार करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
अरुण गोयल यांचा राजीनामा : निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी शुक्रवारी सकाळी राजीनामा दिला होता. त्यांचा राजीनामा शनिवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला होता. कायदा मंत्रालयानं त्याची घोषणा करण्यासाठी अधिसूचना जारी केली होती. यामुळे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे निवडणूक प्राधिकरणाचे एकमेव सदस्य आता राहिले आहेत.
पाच नावांची दोन स्वतंत्र पॅनेल : अनुपचंद्र पांडे हे १४ फेब्रुवारी रोजी सेवानिवृत्त झाले होते. कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या नेतृत्वाखाली गृह सचिव, कार्मिक, प्रशिक्षण विभाग (DoPT) सचिव यांचा समावेश असलेली एक समिती प्रथम दोन पदांसाठी प्रत्येकी पाच नावांची दोन स्वतंत्र पॅनेल तयार करेल. नंतर, पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील तसेच केंद्रीय मंत्री आणि लोकसभेतील काँग्रेस पक्षाचे नेते अधीर रंजन चौधरी यांचा समावेश असलेली निवड समिती निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्तीसाठी दोन व्यक्तींची नावे देईल. निवडणूक आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपती करतील.
कोण आहेत अरुण गोयल? : अरुण गोयल हे 1985 च्या बॅचचे पंजाब केडरचे आयएएस अधिकारी होते. ते नोव्हेंबर 2022 मध्ये निवडणूक आयोगात आयुक्त पदावर रुजू झाले होते. त्यांचा कार्यकाळ 5 डिसेंबर 2027 पर्यंत होता. पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार निवृत्त झाल्यानंतर गोयल हेच मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) झाले असते. मात्र, 8 मार्च रोजी त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिलाय.
हेही वाचा :