ETV Bharat / bharat

नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था, अनेक परदेशी पाहुणे दिल्लीत दाखल - Narendra Modi swearing ceremony

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 8, 2024, 10:30 PM IST

Narendra Modi Swearing Ceremony : नरेंद्र मोदी रविवारी तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. ही केवळ भारतातीलच नव्हे, तर जागतिक लोकशाहीतील एक विलक्षण घटना आहे. आतापर्यंत, सलग तिसऱ्यांदा शपत घेणारे जवाहरलाल नेहरू हे भारताचे एकमेव पंतप्रधान होते. आता हा चमत्कार करणारे नरेंद्र मोदी हे दुसरे पंतप्रधान आहेत.

Narendra Modi
नरेंद्र मोदी (ETV BHARAT MAHARASHTRA Desk)

नवी दिल्ली Narendra Modi Swearing Ceremony : भाजपा नेते नरेंद्र मोदी रविवारी संध्याकाळी 7.15 वाजता सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. शुक्रवारी संध्याकाळी नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला होता. याशिवाय एनडीएच्या नेत्यांनीही पाठिंब्याचं पत्र दिलं आहे. तेलुगू देसम पार्टी (टीडीपी) तसंच जनता दल युनायटेड (जेडीयू) या दोन्ही पक्षांनी आघाडीचे नेते म्हणून मोदींना पाठिंबा दिला आहे.

शपथविधी सोहळ्यासाठी शेख हसीना पोहचल्या : नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा रविवारी संध्याकाळी 7.15 वाजता होणार आहे. या कार्यक्रमात परदेशी पाहुण्यांसह 8 हजारांहून अधिक लोक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. मोदींच्या शपथविधी सोहळ्याला श्रीलंका, मालदीव, भूतान, नेपाळ, मॉरिशसमधील बडे नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना शनिवारी दिल्लीत पोहोचल्या. पंतप्रधानांच्या शपथविधी सोहळ्यासाठी सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. निमलष्करी दलाच्या पाच कंपन्या, एनएसजी कमांडो, ड्रोन, स्नायपरसह सर्व प्रकारची सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

परदेशी पाहुण्यांसाठी कडक सुरक्षा व्यवस्था : परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत गुप्तचर विभागाचे अधिकारीही परदेशी पाहुण्यांसाठी तैनात करण्यात येत आहेत. जेणेकरून विदेशी पाहुण्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये. परदेशी पाहुणे ज्या हॉटेलमध्ये मुक्काम करत आहेत, त्या हॉटेलमधून शपथविधी सोहळ्याच्या ठिकाणी म्हणजेच राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात येत आहे. दिल्ली पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार, शपथविधी सोहळा आणि मान्यवरांची उपस्थिती लक्षात घेता, ग्लायडर, यूएव्ही, यूएएस, मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, रिमोटली पायलट एअरक्राफ्ट, हॉट एअर फुग्यांवर बंदी घालण्यात आली आहे.

भाजपानं जिंकल्या 240 जागा : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील NDA आघाडीनं 292 जागा जिंकल्या आहेत. तर, इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी 234 जागा जिंकल्या. तर, इतरांना 17 जागांवर विजय मिळला आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. भाजपानं 240 जागा जिंकल्या आहेत. मात्र, 2019 च्या तुलनेत त्यांच्या 63 जागा कमी झाल्या आहेत. तिसऱ्या टर्ममध्ये भाजपाच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार स्थापन होत आहे. यासह नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊन जवाहरलाल नेहरूं यांच्या विक्रमाची बरोबरी करणार आहेत.

हे वाचलंत का :

  1. शिंदेंचे नव्हे तर ठाकरेंचे आमदार आमच्या संपर्कात; शिंदेंच्या शिवसेनेचा मोठा दावा - Lok Sabha Result
  2. उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा का घेतला निर्णय? देवेंद्र फडणवीस राजीनाम्याबाबत पहिल्यांदाच बोलले - Devendra Fadnavis
  3. मोदी 3.0 : ठरलं! 9 जून रोजी नरेंद्र मोदी घेणार तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ - NDA gov formation

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.