ETV Bharat / bharat

सरकारी अधिकाऱ्याच्या घरी 'कुबेराचा खजाना'; 100 कोटींहून अधिक मालमत्ता जप्त

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 25, 2024, 9:59 AM IST

Telangana ACB Raids : तेलंगणाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं एका सरकारी अधिकाऱ्याच्या संबंधित 20 ठिकाणी छापेमारी करुन सुमारे 100 कोटींची मालमत्ता जप्त केलीय.

Telangana ACB Raids
Telangana ACB Raids

हैदराबाद Telangana ACB Raids : तेलंगणाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं (ACB) एका सरकारी अधिकाऱ्याकडून सुमारे 100 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केलीय. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी तेलंगणा स्टेट रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी (TSRERA) चे सचिव आणि मेट्रो रेल्वेचे नियोजन अधिकारी एस बालकृष्ण यांच्याशी संबंधित ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले. यापूर्वी त्यांनी हैदराबाद मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट अथॉरिटी (HMDA) मध्ये नगर नियोजन संचालक म्हणून काम केलंय. लाचलुचपत प्रतिबंधक संस्थेच्या 14 पथकांची दिवसभर छापेमारी सुरु होती, ही छापेमारी आजही सुरु होण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत 100 कोटींहून अधिकची मालमत्ता जप्त : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून बुधवारी सकाळी 5 वाजेच्या सुमारास 20 ठिकाणी छापेमारी करण्यात आली. ही छापेमारी आजही सुरु राहू शकते. एसीबीच्या पथकांनी एचएमडीए आणि रेरा कार्यालयांची झडती घेतली, तसंच बालकृष्ण यांच्या घरावर आणि तपासाशी संबंधित इतर महत्त्वाच्या ठिकाणी छापे टाकण्यात आले. बालकृष्ण यांच्या घरावर, कार्यालयांवर, त्यांच्या नातेवाईकांच्या ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले. यात 100 कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता जप्त करण्यात आलीय. आतापर्यंत सुमारे 40 लाख रुपये रोख, 2 किलो सोनं, चल-अचल मालमत्तेची कागदपत्रं, 60 महागडी घड्याळं, 14 मोबाईल फोन आणि 10 लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत.

आणखी मालमत्ता सापडण्याची शक्यता : या अधिकाऱ्याचे बँक लॉकर्स अद्याप उघडलेले नाहीत. एसीबीनं किमान चार बँकांमधील लॉकरची ओळख करुन घेतलीय. एसीबीच्या अधिकाऱ्यांना या अधिकाऱ्याच्या निवासस्थानी कॅश मोजण्याचं यंत्र सापडलंय. एचएमडीएमध्ये काम केल्यानंतर त्यानं संपत्ती मिळवली होती. सध्या सुरु असलेल्या शोधात आणखी मालमत्ता सापडण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

  1. ईडीच्या फेऱ्यात मविआ नेते; रोहित पवार यांच्यानंतर संदीप राऊतांना समन्स तर किशोरी पेडणेकरांची आज होणार चौकशी
  2. कर्नाटकात लोकायुक्त अधिकाऱ्यांचे 35 ठिकाणी छापे, 'इतक्या' कोटींची बेहिशोबी मालमत्ता जप्त
  3. कर्नाटकात लोकायुक्त अधिकार्‍यांचे 63 हून अधिक ठिकाणी छापे, कोट्यवधींची मालमत्ता जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.