ETV Bharat / bharat

भाजपा अध्यक्ष जे पी नड्डांच्या पत्नीची कार चोरी, दिल्ली पोलिसांना चोर सापडेना! - Naddas wife Vehicle stolen

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 25, 2024, 9:31 AM IST

Updated : Mar 25, 2024, 11:44 AM IST

Naddas wife Vehicle stolen : देशाच्या राजधानीत हायप्रोफाईल कार चोरीची घटना समोर आलीय. मात्र, या घटनेला सहा दिवस उलटूनही दिल्ली पोलिसांना यातील आरोपींना पकडण्यात यश मिळालेलं नाही.

बापरे! चक्क भाजपा अध्यक्ष जेपी नड्डांच्या पत्नीची कारच गेली चोरीला

नवी दिल्ली Nadda's wife Vehicle stolen : भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या पत्नीच्या नावानं नोंदणीकृत असलेली टोयटा कार दक्षिण दिल्लीतून चोरीला गेल्याचा आरोप आहे. अद्याप कारचा शोध लागलेला नाही. पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली. ही घटना 19 मार्च रोजी उघडकीस आली. कारचा चालक जोगिंदरनं पांढऱ्या रंगाची टोयोटा फॉर्च्युनर गाडी गोविंदपुरी येथील सर्व्हिस सेंटरमध्ये सोडली. थोड्यावेळानं तो परतला. पण परत आल्यावर कार गायब असल्याचं दिसलं. याप्रकरणी तत्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आलाय.

जे पी नड्डांच्या पत्नीच्या नावावर कारची नोंदणी : एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं की, या घटनेनंतर 'सीसीटीव्ही फुटेज तपासणाऱ्या पोलीस पथकाला ही कार शेवटच्या वेळी गुरुग्रामकडे जाताना दिसली. मात्र, मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करुनही कार चोरीचा छडा लावण्यात यश आलेलं नाही. ही कार जे पी नड्डा यांच्या पत्नीच्या नावावर हिमाचल प्रदेशमध्ये नोंदणीकृत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

दिल्लीत गुन्हेगारीचा वाढता आलेख : दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींना अटक करण्याचं आश्वासन दिलंय. दिल्लीत कारच्या चोऱ्या आणि इतर गुन्ह्यांच्या घटना सर्रास घडतात. एनसीआरबीच्या अहवालानुसार 2022 मध्ये दिल्लीत 501 हत्येचे गुन्हे दाखल झाले. तर 2021 मध्ये 454 तर 2020 मध्ये 461 प्रकरणं नोंदवण्यात आली. या आकडेवारीवर नजर टाकली तर गेल्या काही वर्षांत दिल्लीतील गुन्हेगारीचा आलेख वाढल्याचं दिसतंय.

दर 14 मिनिटाला एक कार चोरीची घटना : राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (दिल्ली-एनसीआर) मध्ये दर 14 मिनिटांनी एक कार चोरीची घटना घडते. 2023 मध्ये दररोज सरासरी 105 कार चोरीची प्रकरणं नोंदवली गेली आहेत. विशेष म्हणजे यात सर्वाधिक कार चोरीच्या घटना या मंगळवार, गुरुवार आणि रविवार या तीन दिवशी घडल्याचं देखील समोर आलंय. त्यामुळं दिल्लीकरांनी या तीन दिवसांत आपल्या कारची विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

हेही वाचा :

  1. 'या' पक्षानं एनडीएबरोबर केली हातमिळवणी, लोकसभेत दोन जागा मिळण्याची शक्यता
  2. जागा वाटपाचा तिढा सुटला? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जे पी नड्डा यांच्यात 'वर्षा'वर तासभर चर्चा

Last Updated : Mar 25, 2024, 11:44 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.