भोपाळ Sonia Gandhi Rajya Sabha Election : मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी यांनी मध्य प्रदेशातून राज्यसभेवर जाण्याच्या शर्यतीतून बाहेर असल्याचं जाहीर केलंय. कमलनाथ यांना मध्य प्रदेशातून राज्यसभेवर पाठवण्याबाबत पक्ष निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सोनिया गांधी मध्य प्रदेशातून राज्यसभेवर निवडून याव्यात, अशी आपली सर्वांची इच्छा आहे. जे पक्ष सोडून गेले ते वर्षानुवर्षे भाजपाचं काम करत होतं. या नेत्यांची यापूर्वीच पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय.
सोनिया गांधींना आवाहन : काँग्रेस प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जितू पटवारी म्हणाले की, "पक्षानं पत्र पाठवून सोनिया गांधींना मध्य प्रदेशातून राज्यसभेवर जाण्याची विनंती केलीय. कमलनाथ यांनीही नुकतीच सोनिया गांधी यांची भेट घेऊन ही विनंती केलीय." कमलनाथ राज्यसभेवर जाणार का, असा प्रश्न त्यांना विचारला असता ते म्हणाले की, 'हे पक्ष ठरवेल'. तसंच मला मिळालेल्या पदावर मी समाधानी आहे. मी राज्यसभेचा उमेदवार नव्हतो. उमेदवार असणारही नसेल, असंही ते म्हणाले.
- यापूर्वी हिमाचल प्रदेशातून सोनिया गांधी राज्यसभेत पोहोचू शकतात, अशी चर्चा होती. तसंच आरोग्याशी संबंधित कारणांमुळं त्या लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची शक्यता पक्षाच्या सूत्रांनी माध्यमांना दिली होती.
प्रियंका गांधी रायबरेलीतून लोकसभेवर : सोनिया गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार नाहीत, तर तिथून कोण निवडणूक लढवणार असा प्रश्न उपस्थित होतोय. यानंतर त्यांची मुलगी आणि काँग्रेस नेत्या प्रियांका वाड्रा गांधी यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय. रायबरेलीची जागा काँग्रेस आणि गांधी परिवारासाठी सुरुवातीपासूनच अत्यंत खास आहे. त्यांच्या वारशाशी जोडलेली ही जागा आहे. सोनिया गांधींपूर्वी या जागेवरुन फिरोज गांधी (जवाहरलाल नेहरुंचे जावई), इंदिरा गांधी, अरुण नेहरू, शीला कौल (कमला नेहरुंच्या भावाच्या पत्नी) असे लोक लढले आहेत. या जागेवरुन फक्त गांधी कुटुंब आणि त्यांचे नातेवाईक निवडणूक लढले होते.
हेही वाचा :