ETV Bharat / bharat

दिवंगत नेत्यांवर टीका करणं चुकीचं, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर शरद पवारांची टीका - शरद पवार

Sharad Pawar on PM : राज्यसभेतील पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण ऐकून दु:ख झाल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. इंदिरा गांधी असोत किंवा जवाहरलाल नेहरू असोत, प्रत्येकानं देशाच्या विकासात योगदान दिलंय. अशा नेत्यांवर टीक करुन मोदींनी चुकीची व्यवस्था स्वीकारली आहे, अशी टीका शरद पवार यांनी मोदींवर केलीय.

Sharad Pawar criticized PM
Sharad Pawar criticized PM
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 7, 2024, 6:54 PM IST

नवी दिल्ली Sharad Pawar on PM : बुधवारी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेससह माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंवर टीका केली होती. तसंच त्यांनी राहुल गांधी, ओबीसी, एससी-एसटी, आरक्षण, पीएसयूसह अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं होतं. त्यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत मोदींवर टीका केलीय.

नेहरुंचं देशासाठी योगदान : पंतप्रधान कोणत्या एका पक्षाचा नसतो, तो देशाचा असतो, माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचं देशाच्या विकासात योगदान विसरता येणार नाही. मोदींनी दिवंगत नेत्यांवर टीका करणं योग्य नाही. मला पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण ऐकून वाईट वाटलं. विज्ञान तसंच तंत्रज्ञान क्षेत्रात नेहरूंनी मोलाचं योगदान दिलं आहे, असं शरद पवार म्हणाले.

मोदींचं भाषण ऐकून वाईट वाटलं : पंतप्रधान मोदींच्या भाषणाबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, "पंतप्रधान देशाचे असतात. पंडित जवाहरलाल नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान होते. नेहरूंनी देशाचा चेहरामोहरा बदलण्याचं काम केलं. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत नेत्यांवर टीका करणं योग्य नाही. मोदींचं भाषण ऐकून दु:ख झालं. इंदिरा गांधी असोत किंवा जवाहरलाल नेहरू असोत, प्रत्येकानं देशाच्या विकासात योगदान दिलं आहे. मात्र, नरेंद्र मोदींनी चुकीची व्यवस्था स्वीकारली आहे."

'त्यांच्या' विचारांच्या विरोधात लढायचं : देशातील विद्यापीठांवर काही लोक हल्ला करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही शरद पवार यांनी केलाय. विद्यापीठात त्यांचा विचार पसरवणाऱ्या अशा विचारांच्या विरोधात आपल्याला लढायचं आहे. वस्तीगृहाची व्यवस्था विद्यापीठात नसेल तर, या विरोधात आंदोलन उभारण्याची गरज असल्याचं शरद पवार म्हणाले.

शरद पवारांना धक्का : केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाव आणि चिन्हाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय मंगळवारी घेतलाय. या निकालामुळं उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळालाय, तर शरद पवारांना मोठा धक्का बसलाय. त्यामुळं आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन नावे आणि चिन्हांचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडं पाठवण्याचं आदेश शरद पवार यांच्या गटाला देण्यात आले होते. निवडणूक आयोगाच्या या आदेशानुसार शरद पवार गटाकडून तीन नावे निवडणूक आयोगाकडं प्रस्तावित करण्यात आली होती. त्यानुसार आता शरद पवार गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार' हे नाव देण्यात आलंय.

दिल्लीत शरद पवार गटाचं शक्तिप्रदर्शन : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर दिल्लीत शरद पवार गटाच्या हालचाली वाढल्या आहेत. 'आमचा पक्ष, आमचं चिन्ह' असा मजकूर असलेले बॅनर शरद पवार यांच्या गटानं दिल्लीत लावली आहेत. यानंतर विशेष म्हणजे खुद्द शरद पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. मात्र, त्यांनी निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर कोणतंही भाष्य केलेलं नाही. त्यामुळं शरद पवार पुढं काय निर्णय घेणार याकडं सर्वांच लक्ष लागलंय.

हे वाचलंत का :

  1. सरकारची तिसरी टर्म दूर नाही, काँग्रेसनं BSNL, MTNL, HL ला बरबाद केलं; राज्यसभेत पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
  2. "अद्याप काशी, मथुरेचं मंदिर बाकी आहे", संघाच्या महत्वाच्या नेत्याचं पुण्यात मोठं विधान
  3. अजित पवारांची खेळी; शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याअगोदर 'कॅव्हेट' दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.