फतेहपूर (सीकर) Seven people died in an accident in Fatehpur : राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील फतेहपूरमध्ये कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सात जणांना प्राण गमावावे लागले. अपघातानंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतल्यामुळं त्यातील 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला. यामध्ये 2 लहान मुलींचाही समावेश आहे. हे सर्व जण मेरठ, उत्तर प्रदेशचे रहिवासी होते.
सात जणांचा होरपळून मृत्यू : फतेहपूर येथे राष्ट्रीय महामार्गावर मागून येणाऱ्या ट्रकला कार धडकल्यामुळं सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. अपघातानंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला त्यामुळं प्रवाशांना बाहेर पडता आलं नाही. महामार्गावरील अपघाताची माहिती मिळताच पोलीस, स्थानिक प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यासोबतच अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
अपघात होताच कारला आग : कोतवाल सुभाष बिजारनियान यांनी सांगितलं की, कार पाठीमागून फतेहपूरजवळील सालासर पुलिया येथे चुरूकडे जाणाऱ्या ट्रकला धडकली, ज्यामुळं ट्रक आणि कार दोघांनाही आग लागली. कारमध्ये बसवण्यात आलेल्या गॅस किटमुळं आगीनं भीषण रूप धारण केलं. त्यामुळं कारमधील सातही जण जिवंत जळून खाक झाले. यामध्ये २ मुलांचाही समावेश आहे. त्याचवेळी ट्रकमध्ये धाग्याचे रोल ठेवण्यात आले होते. त्यांनाही आग लागली. स्थानिक लोकांच्या मदतीनं पोलिसांनी सर्व मृतदेह स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत.
बालाजीचं दर्शन घेऊन परतताना मृत्यू : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमध्ये सापडलेला मोबाईल फोन चालू असताना मृतांच्या नातेवाईकांशी बोलणं सुरू होतं. सर्व मृतक मेरठचे रहिवासी होते. ते सालासर बालाजीचं दर्शन घेऊन परत मेरठला जात होते. यावेळी फतेहपूरजवळ त्यांचा अपघात झाला. मृतांमध्ये मुकेश गोयल, नीलम गोयल, आशुतोष गोयल, मंजू बिंदल, महेश बिंदल, हार्दिक बिंदल, स्वाती बिंदल, दीक्षा बिंदल तसंच एका लहान मुलीचा समावेश आहे. पोलिसांनी मृतांच्या कुटुंबीयांना माहिती दिली आहे. नातेवाईक आल्यानंतर सोमवारी मृताचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
हे वाचलंत का :
- सुट्टीच्या दिवशी भरविली शाळा; बस पलटी होऊन सात विद्यार्थ्यांचा मृत्यू - Haryana School Bus Accident
- छत्तीसगडच्या भीषण अपघाताची चौकशी करण्याचे दुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, राष्ट्रपतीसह पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक - durg bus accident
- खासगी कंपनीची बस 40 फूट खोल खाणीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू - Durg Bus Accident