ETV Bharat / bharat

7 कुख्यात नक्षलवाद्यांना सुरक्षा दलांनी ठोकल्या बेड्या; एकावर होतं 'इतकं' बक्षीस - Naxalite Arrested In Sukma - NAXALITE ARRESTED IN SUKMA

Naxalite Arrested In Sukma : सुकमामध्ये 7 कुख्यात नक्षलवाद्यांना अटक करण्यात सुरक्षा दलांना यश आलं. यातील एका नक्षलवाद्यावर एक लाखाचं बक्षीस सरकारनं जाहीर केलं होतं. पकडण्यात आलेले नक्षलवादी लोकसभा निवडणूक 2024 च्या काळात घातपात घडवण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Naxalite Arrested In Sukma
संग्रहित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 15, 2024, 11:58 AM IST

रायपूर Naxalite Arrested In Sukma : नक्षलवाद्यांचा गड मानल्या जाणाऱ्या सुकमा जिल्ह्यात रविवारी 7 नक्षलवाद्यांना सुरक्षा दलांनी अटक केलं. या पकडण्यात आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये एका नक्षलवाद्यावर 1 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. निवडणुकीपूर्वी एकाचवेळी 7 नक्षलवाद्यांना अटक केल्यानं जवानांचं मनोबल उंचावलं आहे. विशेष म्हणजे पकडण्यात आलेले नक्षलवादी निवडणूक काळात मोठा घातपात घडवण्याच्या तयारीत होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

निवडणूक काळात राबवण्यात आली शोधमोहीम : सध्या लोकसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी जोरात सुरू आहे. सुरक्षा दलांनी निवडणुकीच्या काळात बस्तरसह सुकमा परिसरात मोठा चोख बंदोबस्त ठेवला आहे. निवडणूक असल्यानं सुरक्षा दलांनी किस्त्रम परिसरात शोधमोहीम राबवली. यावेळी सुरक्षा दलांना 7 नक्षलवाद्यांना बेड्या ठोकण्यात यश आलं.

कुख्यात नक्षलवाद्यांना ठोकल्या बेड्या : सुकमा जिल्ह्यात 7 कुख्यात नक्षलवाद्यांना अटक करण्यात सुरक्षा दलांना यश आलं. त्यामुळे निवडणूक काळात कर्तव्य बजावणाऱ्या जवानांचं मनोबल उंचावलं आहे. याबाबत कामा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, "सुरक्षा दलांनी किस्त्रम परिसरात शोधमोहीम राबवली होती. या शोधमोहिमेदरम्यान 7 कुख्यात नक्षलवाद्यांना अटक करण्यात सुरक्षा दलांना यश आलं. पकडण्यात आलेल्या नक्षलवाद्यांची माडवी देवा उर्फ ​​दिनेश मडवी, बंजाम पोज्जा, कावासी उर्फ ​​वांडो आयता, कलमू गंगा, कलमू सन्ना, नुप्पो पोज्जा आणि रवा जोगा अशी नावं आहेत."

कुख्यात नक्षलवाद्यावर होते एक लाखाचं बक्षीस : सुकमा जिल्ह्यात पकडण्यात आलेल्या 7 नक्षलवाद्यांचा निवडणूक काळात घातपात घडवण्याच्या प्रयत्नात होते, असा दावा सुरक्षा दलांकडून करण्यात आला. "पकडण्यात आलेला कुख्यात नक्षलवादी कावासी उर्फ ​​वांडो अयाता हा टेटमगुडू रिव्होल्युशनरी कौन्सिल ( RPC ) च्या अंतर्गत कार्यरत असलेल्या "दंडकारण्य आदिवासी किसान मजदूर संघटना" (DAKMS) या संघटनेचा अध्यक्ष होता. दंडकारण्य आदिवासी किसान मजदूर संघटना ही संघटना नक्षलवाद्यांची आघाडीची संघटना आहे. बंजाम पोज्जा बेकायदेशीर संघटना असलेल्या किस्तराम एरिया समितीच्या पदियारो परिवार समितीचा अध्यक्ष आहे. कलमू गंगा उप मिलिशिया कमांडर होता. बाकीचे नक्षलवादी विविध पदावर नक्षलवादी संघटनेत कार्यरत होते," अशी माहिती पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांनी दिली.

हेही वाचा :

  1. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यापूर्वी छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश, चकमकीत ९ नक्षलवादी ठार - Bijapur Naxal Encounter
  2. हिदूर जंगलातील चकमकीत नक्षलवादी ठार, बस्तर फायटरच्या जवानाला वीरमरण
  3. छत्तीसगडमध्ये मोठा नक्षलवादी हल्ला; 3 जवान हुतात्मा, 10 हून अधिक जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.