ETV Bharat / bharat

गॅस सिलिंडरपासून ते मोबाईल रिचार्जपर्यंत...आजपासून बदलले 'हे' नियम; तुमच्या खिशावर होणार मोठा परिणाम - Rule Change From 1st July 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 1, 2024, 7:34 AM IST

Rule Change : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी अनेक आर्थिक बदल होतात. या नियमांचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होतो. आजपासून बँक खात्यांपासून क्रेडिट कार्ड बिलिंगपर्यंत अनेक नियमांमध्ये महत्त्वाचे बदल लागू झाले आहेत. आजपासून बदलणारे नियम जाणून घ्या.

Rules Changes From July
Rules Changes From July (Source - ETV Bharat)

नवी दिल्ली Rules Changes From July : आजपासून जुलै महिना सुरू झाला असून पहिल्या तारखेपासून अनेक बदल लागू केले जात आहेत. जुलैमध्येही बँकिंग, फास्टॅग सेवा आणि इतर क्षेत्रांशी संबंधित अनेक नियमांमध्ये बदल पाहायला मिळतील. यातील काही नियम डिजिटल वॉलेट, क्रेडिट कार्ड आणि गॅस सिलेंडरशीही संबंधित आहेत. या नियमांचा आण बदलांबद्दल थेट परिणाम तुमच्या खिशावर होऊ शकतो. त्यामुळे जुलै महिन्यापासून कोणते नियम बदलणार आहेत ते जाणून घेऊयात.

आजपासून बदलणारे 'हे' नियम

  1. गॅस सिलिंडरच्या दरात बदल : आजपासून एलपीजी सिलेंडर, सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीत वाढ होऊ शकते. एलपीजी सिलिंडरची किंमत दर महिन्याच्या पहिल्या दिवशी ठरवली जाते.
  2. फास्टॅग सेवा शुल्कात वाढ : फास्टॅग सेवा देणाऱ्या बँकिंग कंपन्या 1 जुलैपासून नवीन शुल्क आकारणार आहेत. ग्राहकांना आता टॅग व्यवस्थापन, शिल्लक माहिती आणि दर तीन महिन्यांनी पेमेंट तपशील प्राप्त करण्यासाठी शुल्क भरावे लागेल.
  3. तीन नवे कायदे आजपासून लागू : भारतीय न्यायिक संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा कायदा हे तीन नवे फौजदारी कायदे आजपासून लागू होणार आहेत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात या कायदे मंजूर करण्यात आले. नवीन कायद्यात कलम 375 आणि 376 च्या जागी बलात्कारासाठी कलम 63 येणार आहे.
  4. कार खरेदी करणे महाग : टाटा मोटर्सने 1 जुलैपासून आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किमती 2 टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली आहे. वाढीव खर्च भरून काढण्यासाठी ही वाढ करण्यात येत आहे.
  5. मोबाईल रिचार्ज होणार महाग : जिओ, एअरटेल आणि वोडाफोन सारख्या आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांनी मोबाइल दरांमध्ये बदल जाहीर केले आहेत, जे जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून लागू होतील.
  6. नवीन मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी नियम : देशात 1 जुलै 2024 पासून मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी नियमात बदल झाला आहे. दूरसंचार नियामक ट्रायने सिम स्वॅप फसवणूक टाळण्यासाठी सिम कार्ड चोरी किंवा नुकसान झाल्यास लॉकिंग कालावधी सात दिवसांपर्यंत वाढवला आहे. याचा अर्थ असा की, आता तुम्हाला लगेच सिम मिळणार नाही, उलट त्यासाठी तुम्हाला 7 दिवस वाट पाहावी लागेल.
  7. क्रेडिट कार्ड बिल भरण्याचे नवीन नियम : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने 1 जुलैपासून एक नवीन नियम लागू केला आहे, ज्यानुसार सर्व क्रेडिट कार्ड बिल पेमेंट भारत बिल पेमेंट सिस्टमद्वारे क्रेडिट कार्ड पेमेंटची प्रक्रिया करावी लागेल. या बदलाचा उद्देश पेमेंट प्रक्रिया सुव्यवस्थित करणे आणि सुरक्षा वाढवणे हा आहे. मात्र, अद्याप सर्वच बँकांनी ही प्रणाली लागू केलेली नाही.
  8. आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख : आर्थिक वर्ष 2023-24 साठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2024 आहे. परंतु आपण अंतिम मुदतीपर्यंत सबमिट करण्यात अयशस्वी झाल्यास तरीही आपण 31 डिसेंबर 2024 पर्यंत लेट रिटर्न भरू शकता.
  9. पेटीएम वॉलेट बंद केले जातील : पेटीएम पेमेंट्स बँकेने जाहीर केले आहे की, शून्य शिल्लक असलेले निष्क्रिय वॉलेट आणि गेल्या वर्षात किंवा त्याहून अधिक काळापासून व्यवहार न केलेले वॉलेट 20 जुलै 2024 रोजी बंद केले जातील. पेटीएम पेमेंट्स बँकेकडून वापरकर्त्यांना एक संदेश पाठविला जाईल, त्यांना त्यांचे वॉलेट बंद करण्यापूर्वी 30 दिवसांचा कालावधी दिला जाईल.

हेही वाचा

  1. शाब्बास! ऐतिहासिक विजयाबद्दल राष्ट्रपती, पंतप्रधानांसह राजकीय नेत्यांकडून भारतीय संघाचं अभिनंदन - T20 World Cup 2024 Final
  2. जमीन घोटाळा प्रकरण : हेमंत सोरेन यांना मोठा दिलासा, झारखंड उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर - Hemant Soren Grants Bail
  3. नीट पेपर लिक प्रकरण : विरोधकांचा नीटवरुन लोकसभेत गदारोळ, राहुल गांधी आक्रमक - Lok Sabha Session 2024
  4. दिल्लीत मुसळधार पाऊस; IGI विमानतळाचं छत कोसळलं; एकाचा मृत्यू तर पाच जण गंभीर - Roof Collapsed at Delhi Airport

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.