नवी दिल्ली Roof Collapsed at Delhi Airport : दिल्लीच्या IGI विमानतळाच्या टर्मिनल वनजवळील छताचा काही भाग कोसळला. दिल्ली अग्निशमन दलाला छत कोसळल्याचा फोन आला, त्यानंतर अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. या दुर्घटनेत चारजण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
#WATCH | Heavy overnight rainfall leaves several parts of Delhi waterlogged. Visuals from Aurobindo Road pic.twitter.com/abMZ9j6RWs
— ANI (@ANI) June 28, 2024
दिल्लीत मुसळधार पाऊस सुरू : fराजधानी दिल्लीत हवामान बदललं असून, मुसळधार पाऊस पडत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, IGI विमानतळाच्या टर्मिनल 1 वर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास छत कोसळलं. तेथे उभ्या असलेल्या काही वाहनांना याचा फटका बसून त्यांचे नुकसान झाले. दिल्ली अग्निशमन दलाचे संचालक अतुल गर्ग यांनी या प्रकरणाला दुजोरा दिला.
#WATCH | Yash, a passenger at Terminal 1 of Delhi airport, says, " i was going to bangalore, i had a flight at 8:15 am. here the roof collapsed around 5, 5:15 am... the airport authority has no answer..." https://t.co/CETWtY95jz pic.twitter.com/kjbWJ5UMhd
— ANI (@ANI) June 28, 2024
गाड्यांचं नुकसान : शुक्रवारी पहाटे झालेल्या संततधार पावसामुळं IGI विमानतळाच्या T-1 च्या छताचा काही भाग अचानक खाली पडला, त्यामुळं तिथे उभ्या असलेल्या कार टॅक्सी चालकांना त्याचा फटका बसला. घटनेची माहिती पोलीस, रुग्णवाहिका व अग्निशमन विभागाला देण्यात आली. सध्या जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. इतर विभागांचे पथकही घटनास्थळी दाखल झालं आहे.
#WATCH | Visuals from outside the residence of Delhi Water Minister Atishi. The area around her residence is inundated following heavy rainfall. pic.twitter.com/GCs9ec4VpW
— ANI (@ANI) June 28, 2024
मुसळधार पावसाचा फटका दिल्ली विमानतळाला : देशातील गजबजलेल्या विमानतळांपैकी दिल्लीचं हे एक विमानतळ आहे. येथून लाखो लोक देशासह विदेशात प्रवास करत असतात. त्यामुळं विशेष सुरक्ष व्यवस्था या विमानतळाला आहे. आता दिल्लीत सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका या विमानतळाला बसला आहे. पावसाचा जोर वाढला असल्यानं काही विमानांची उड्डाणं रद्द केली असून काही विमानं उशिरानं धावत असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
#WATCH | Drone visuals around AIIMS in Delhi show the current situation in the area as it remains waterlogged due to incessant heavy rainfall.
— ANI (@ANI) June 28, 2024
(Visuals shot at 10:30 am) pic.twitter.com/GCRpNxJ0vb
एकाच पावसानं दिल्ली तुंबली : दिल्ली-एनसीआरमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळं रस्त्यांची नदीच झाली आहे. अनेक भागातील घरांमध्ये पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. लुटियन्स दिल्ली हे व्हीव्हीआयपी क्षेत्र मानले जाते. येथे पावसामुळं घरांमध्ये पाणी तुंबल्याने नवी दिल्ली नगर परिषदेच्या (NDMC) कामाचा पर्दाफाश झाला. एकाच पावसामुळं व्हीव्हीआयपींच्या घरांमध्ये पाणी गेलं असून, तर सर्वसामान्यांच्या घरांची काय अवस्था असेल याचा अंदाज बांधता येतो, अशी प्रतिक्रिया येथील नागरिकांनी दिली. दिल्लीतील अनेक भागात ड्रेनेजची व्यवस्था नाही. त्यामुळं दिल्ली एकाच पावसामुळं तुंबली आहे.
हेही वाचा - दिल्ली दारू घोटाळा प्रकरण : अरविंद केजरीवाल यांना सीबीआयकडून अटक - Arvind Kejriwal Arrest By CBI