ETV Bharat / bharat

2 किलोमीटरचा रस्ताच गेला चोरीला; पोलीसही चक्रावले! - Road theft at Basaguda

Road theft at Basaguda : नक्षलग्रस्त जिल्हा विजापूर माओवाद्यांमुळं सतत चर्चेत असतो. मात्र, विजापूरच्या बासागुडामध्ये रस्ताच चोरीला गेल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी अतिशय हुशारीनं 2000 मीटर लांबीचा रस्ता गायब केला आहे.

Road theft at Basaguda
Road theft at Basaguda
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 29, 2024, 10:59 PM IST

Updated : Mar 1, 2024, 11:56 AM IST

विजापूर Road theft at Basaguda : चोरीच्या अनेक घटना तुम्ही वर्तमानपत्रातून वाचल्या असतील. मात्र, तुम्ही कधी रस्ताच चोरीला गेल्याची घटना कुठं वाचली का नाही ना? मात्र, असाच एक प्रकार विजापूरच्या बासागुडा इथं घडला आहे. बासागुड्यात चक्क संपूर्ण रस्ता चोरीला गेला आहे. चोरट्यांनी अतिशय हुशारीनं 2000 मीटर लांबीचा रस्ता गायब केला आहे. त्यामुळं चोरीला गेलेला रस्त्याची तक्रार देण्यासाठी गावातील लोक पोलिसांत पोहोचले आहेत. मात्र, तक्रार कशाच्या आधारावर दाखल करून घ्याची असा प्रश्न पोलिसांना पडला आहे.

बासागुड्यात PMGSY रस्ता चोरीला : बसगुड्यात खेड्यांचा विकास करण्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत 2000 मीटर लांबीचा रस्ता बांधण्यात येणार होता. सन 2018 मध्ये शासनाकडून रस्त्याच्या कामाला मंजूरी मिळाली होती. त्यामुळं रस्त्याचं काम सुरू होईल अशी गावकऱ्याना अपेक्षा असताना रस्ताच चोरीला गेलाय. या रस्त्याचं काम 2022 मध्ये पूर्ण होईल, असा फलक कामाच्या ठिकाणी लावण्यात आला होता. मात्र, आतापर्यंत रस्त्याचं काम सुरू न झाल्यानं ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. त्यामुळं गावातील लोकांनी आता रस्त्याबाबत आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. भाजपा नेतेही या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत आहेत. या प्रकणात भाजपानं सहा सदस्यांची टीमही तयार केली असून घटनास्थळी जाऊन ते पाहणी करणार आहेत.

उटकेल गावापासून पटेल पारापर्यंत रस्ता बांधकामाचा फलक लावण्यात आला आहे. रस्त्याची पाहणी केली असता रस्त्याच काम केलेलं दिसत नाहीय. ग्रामस्थ, सरपंचानं देखील रस्त्याचं कामही झालं नसल्याचं सांगितलंत. त्यामुळं आम्ही रस्ता चोरीला गेल्याची तक्रार पोलीस अधीक्षकांकडं केली आहे.- इशू सोनी, तक्रारदार

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत एकही रस्ता तयार झाला नसल्याची बातमी आली आहे. या संदर्भात पीएमजीएसवायच्या अधिकाऱ्यांना रस्ता का बांधला नाही? रस्त्याचं काम पूर्ण झाल्याची माहिती कशी देण्यात आली याचं स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आहे. संपूर्ण प्रकरण गंभीर असून, त्याची चौकशी करू. - अनुराग पांडे, जिल्हाधिकारी

आम्ही सहा सदस्यांची टीम तयार केली आहे. आमची टीम घटनास्थळी जाऊन चौकशी करेल. आवपल्ली विकास गटातील पोटकेल गावात दोन किलोमीटरचा रस्ता तयार करण्यात आला होता, मात्र आता हा रस्ता पूर्णपणं गायब झाला आहे. यात भ्रष्टाचार झाला असून त्याची चौकशी झालीच पाहिजे. - श्रीनिवास मुदलियार, जिल्हाध्यक्ष, भाजपा

कागदपत्रांवर रस्ता पूर्ण : 2 मे 2022 रोजी रस्ता तयार होणार असल्याची माहिती सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावरही देण्यात आली होती. हा रस्ता प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत बांधण्यात येणार होता. तसंच पुटकल ते पटेलपारा हा रस्ताही बनवला जात असल्याचं त्यात दाखवण्यात आलं होतं. मात्र, कागदपत्रांवर रस्ता पूर्ण झाल्याचं दाखून मोठा भ्रष्टाचार झाल्याचं दिसून येत आहे.

हे वाचलंत का :

  1. माजी क्रिकेटपटू युवराज सिंगच्या घरी चोरी, दोन नोकरांवर गुन्हा दाखल
  2. हरवलेले-चोरी गेलेले मोबाईल फोन सापडतात, रेल्वे पोलिसांनी चोरीचे 150 मोबाईल केले जप्त
  3. ओमान दूतावासाच्या लेटरहेडवर डल्ला: चालकानं 4 कोरे लेटरहेड केले लंपास, गुन्हा दाखल

Last Updated : Mar 1, 2024, 11:56 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.