ETV Bharat / bharat

रामोजी राव यांना भारतरत्न देणं आपली जबाबदारी - मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू; अमरावतीच्या विकासासाठी किरण राव यांनी दिले १० कोटी रुपये - commometation meeting of Ramoji Rao

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 27, 2024, 8:01 PM IST

Updated : Jun 27, 2024, 10:40 PM IST

commometation meeting of Ramoji Rao - रामोजी राव यांना आदरांजली वाहण्यासाठी आज आंध्रप्रदेशमध्ये विजयवाडा इथे स्मृतीसभेचं आयोजन सरकारतर्फे करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी रामोजी राव यांना भारत रत्न हा देशाचा सर्वोच्च सन्मान मिळाला पाहिजे, एवढंच नाही तर त्यांना भारतरत्न देणं ही आपली जबाबदारी असल्याचं ते म्हणाले. यावेळी अमरावतीच्या विकासाकरता किरण राव यांनी १० कोटींचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. विविध मान्यवरांनी यावेळी रामोजी राव यांना आदरांजली वाहिली.

memorial meet in honour of ramoji rao
रामोजी राव यांना आदरांजली वाहण्यासाठी आज आंध्रप्रदेशमध्ये विजयवाडा इथे स्मृतीसभेचं आयोजन (Etv Bharat)

विजयवाडा commometation meeting of Ramoji Rao : रामोजी समुहाचे संस्थापक रामोजी राव यांना आज आंध्रप्रदेश सरकारतर्फे आदरांजली वाहण्यासाठी विशेष स्मृतीसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री एन. चंद्रबाबू नायडू यांनी रामोजी राव यांना भारत रत्न देण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. तसंच रामोजी राव यांच्या नावाने विविध उपक्रमांची घोषणा यावेळी चंद्रबाबू नायडू यांनी केली.

रामोजी राव यांना आदरांजली वाहण्यासाठी आज आंध्रप्रदेशमध्ये विजयवाडा इथे स्मृतीसभेचं आयोजन (ETV Bharat)

पुढे बोलताना मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू म्हणाले की, रामोजी राव यांनी स्थापन केलेल्या संस्था त्यांच्या फक्त कुटुंबासाठी नव्हत्या, तर त्यांनी किमान १० कोटी लोकांना आपल्या संस्थांच्या माध्यमातून जगण्याचं बळ दिलं. त्यांना भारतरत्न देणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. यावेळी मुख्यमंत्री चंद्राबाबू यांनी रामोजी राव यांच्या स्मरणार्थ विविध उपक्रमांच्या घोषणाही केल्या. अमरावतीमध्ये रामोजी विज्ञान केंद्र उभारणार असल्याचं त्यांनी सांगितलं. अमरावतीतील एका रस्त्याला रामोजी राव यांचं नाव देण्याची घोषणाही त्यांनी केली. विशाखापट्टणममध्ये फिल्म सिटीला रामोजी राव यांचं नाव देणार असल्याचंही ते म्हणाले.

ईनाडूच्या माध्यमातून रामोजी राव यांनी निष्पक्ष पत्रकारिता केली. ईनाडूमध्ये सर्व पक्षांच्या नेत्यांना प्राधान्य देण्यात आलं. त्यांनी विश्वासार्ह पत्रकारितेची तत्व अगदी सचोटीनं जपली. काम करता-करता मृत्यूची त्यांची इच्छाही पूर्ण झाली. पत्रकार, कलाकार, अभिनेते याचबरोबर त्यांनी समाजासाठी आपलं संपूर्ण जीवन वाहिलं, त्यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे अशी भावना यावेळी चंद्राबाबू यांनी व्यक्त केली. हैदराबादच्या विकासात रामोजीरावांची भूमिका महत्त्वाची आहे. आंध्रप्रदेशच्या राजधानीचे नाव अमरावती ठेवावे, अशी सूचना त्यांनीच केली होती. दुर्गम खेड्यात जन्म घेऊन चिकाटीने रामोजी राव शिखरावर पोहोचले. रामोजी राव ही व्यक्ती नसून व्यवस्था आहे. त्यांनी निवडलेल्या प्रत्येक क्षेत्रात ते नंबर 'वन' होते. सचोटी आणि प्रामाणिकपणाचे प्रतीक रामोजी राव होते. त्यांनी जे काही केलं त्यात त्यांना नेहमीच जनहित पाहिलं. प्रसारमाध्यम क्षेत्रातील त्यांच्या कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना आता भारत रत्न देण्याची आपली जबाबदारी आहे.

यावेळी बोलताना रामोजी राव यांचे चिरंजीव किरण राव यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, "माझ्या वडिलांनी नवंध्राच्या राजधानीसाठी अमरावती हे नाव सुचवलं. अमरावती हे देशातील सर्वात मोठं शहर झालं पाहिजे. त्यामुळे अमरावतीच्या विकासाकरता 10 कोटी रुपयांची देणगी देत असल्याचं किरण राव यांनी जाहीर केलं. यावेळी या देणगीचा धनादेश मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना सुपूर्द करण्यात आला. वडिलांच्या स्मृती सभेला उपस्थित असलेल्या सर्वांना विनम्र अभिवादन करत असल्याचं ते म्हणाले. या आयोजनासाठी त्यांनी आंध्रप्रदेश सरकारचे आभार मानले. रामोजी राव यांनी लोकशाही मूल्ये जपण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले. कितीही अडचणी आल्या तरी ते जनतेच्या पाठीशी उभे राहिले. कुठेही आपत्ती आली तर ते मदतीसाठी सदैव तत्पर असायचे. वडिलांच्या भावनेने लोकांच्या कल्याणासाठी आम्ही स्वतःला झोकून देऊ, असं यावेळी किरण राव यांनी सांगितलं.

यावेळी बोलताना ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक राजामौली यांनी रामोजी राव यांनी चित्रपट सृष्टीसाठी दिलेल्या महान योगदानाची माहिती दिली. त्यांच्या उत्तुंग कार्यापुढे त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो असा भावनिक सवाल त्यांनी केला. तसंच तेलुगु जनतेसाठी त्यांनी विविध माध्यमातून केलेलं काम एवढे मोठं आहे की, रामोजी राव यांचं कार्य पाहता त्यांना भारत रत्न देणं अत्यंत योग्य आहे. रामोजी राव यांना भारतरत्न देण्याची विनंता या स्मृतीसभेच्या निमित्तानं आपण केंद्रसरकारला करतो असं राजामौल यांनी यावेळी सांगितंलं.

ज्येष्ठ पत्रकार आणि द हिंदू पब्लिशिंग ग्रुपचे संचालक एन राम यांनी आजची ही स्मृतीसभा म्हणजे रामोजी राव यांना सर्वोत्कृष्ट श्रद्धांजली असल्याचं सांगून माध्यमऋषी दिवंगत रामोजी राव यांनी ज्या पत्रकारितेच्या मूल्यांसाठी जागून लढा दिला, तो अतुलनिय असल्याचं सांगितलं. पत्रकारितेच्या तत्त्वांसाठी रामोजी राव कसे उभे राहिले, ते कधीही सत्य बोलण्यास घाबरत नव्हते असंही त्यांनी सांगितलं. तसंच "भारतीय वृत्तपत्रांच्या इतिहासातील एक उत्कृष्ट आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व असलेल्या रामोजी राव यांच्या वारशाचा आम्ही सन्मान आणि स्मरण करतो" असंही एन. राम म्हणाले. त्याचवेळी पत्रकारांच्या सुरक्षेसाठी कायदे केले जातील अशी अपेक्षा मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याकडून त्यांनी व्यक्त केली. मृत्यू हे शास्वत सत्य आहे याची कल्पना रामोजी राव यांना होती. त्याबद्दल ते त्यांच्या कुटुंबीयांशीही बोलत असत. त्यामुळे अत्यंत धीरोदात्तपणे मृत्यूही स्वीकारण्याची त्यांची आधीच तयारी झाली होती, असं त्यांच्याच नातीकडून आपल्याला समजलं. हे मोठ्या तत्वचिंतकालाच जमू शकतं, या शब्दात राम यांनी रामोजी राव यांना शेवटी अभिवादन केलं.

येथील कानूर येथे झालेल्या कार्यक्रमाला चित्रपट आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती होती. या पार्श्वभूमीवर रामोजी राव यांच्या जीवनातील अनमोल क्षणांच्या छायाचित्राचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि मंत्री नारा लोकेश यांनी रामोजी राव यांच्या स्मृतिसभेत त्यांच्याविषयी कृतज्ञता भाव व्यक्त करुन अभिवादन केलं. या कार्यक्रमात रामोजी राव यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते.

हेही वाचा :

  1. रामोजी ग्रुपचे संस्थापक दिवंगत 'पद्मविभूषण' रामोजी राव यांना आंध्रप्रदेश सरकारकडून आदरांजली; विजयवाडामध्ये अभिवादन सभेचं आयोजन - AP Govt Tribute To Ramoji Rao

Last Updated : Jun 27, 2024, 10:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.