ETV Bharat / bharat

'आमचे दरवाजे खुले तसे कारागृहाचे दरवाजेही खुले'; पक्षांतराचा 'आठवले स्टाईल फंडा' - Ramdas Athawale On ED Raids

Ramdas Athawale On ED Raids : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देहराडून इथं भेट दिली. यावेळी त्यांनी आमच्या येणाऱ्या नेत्यांची चौकशी बंद होत नाहीत. जसे आमचे दरवाजे उघडे आहेत, तसेच कारागृहाचे दरवाजेही उघडे आहेत, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादीतील फूट यावरही भाष्य केलं.

Ramdas Athawale On ED Raids
केंद्रीय मंत्री रामदास आठवले
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 5, 2024, 2:12 PM IST

Updated : Apr 5, 2024, 3:16 PM IST

केंद्रीय मंत्री रामदास आठवले

चंदीगड Ramdas Athawale On ED Raids : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर देहराडूनच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांना माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली. ईडीच्या भीतीनं अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केल्याचा आरोप सातत्याने करण्यात येतो. यावर रामदास आठवले यांना प्रश्न विचारण्यात आला. मात्र "आमच्याकडं आलेल्या नेत्यांच्या चौकशा बंद झाल्या नाहीत. जसे आमचे दरवाजे खुले आहेत, तसेच कारागृहाचे दरवाजेही खुले आहेत. त्यांना जेव्हा उचलायचं तेव्हा ईडीवाले उचलतील," असं खुमासदार उत्तर त्यांनी दिलं.

आमचे दरवाजे खुले तसे कारागृहाचे दरवाजे खुले : "भाजपामध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांविरोधातील तपास संपला असं अजिबात नाही. भाजपामध्ये आलेल्या नेत्यांवर ईडीचे आरोप आहेत, पण ते आरोप सिद्ध झालेले नाहीत. आमच्याकडं येणाऱ्यांसाठी आमचे दरवाजे उघडे आहेत. जसे आमचे दरवाजे उघडे आहेत, तसेच कारागृहाचे दरवाजेही खुले आहेत. त्यांना पाहिजे तेव्हा ते जाऊ शकतात. ईडीला जेव्हा त्यांना उचलायचे असेल, तेव्हा ते त्यांना उचलू शकतात. पण जे आमच्याकडे येतात त्यांना पक्षात घेणं हे आमचं काम आहे," असं रामदास आठवले यांनी यावेळी स्पष्ट केलं.

उद्धव ठाकरेंना धक्का द्यायचा होता : महाराष्ट्रातील शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत सरकार स्थापन केलं. याबाबत बोलताना रामदास आठवले म्हणाले, "महाराष्ट्रात एकनाथ शिंदे 50 आमदारांसह भाजपासोबत आले. आम्ही त्यांना आणलं, असं मुळीच नाही. उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले. भाजपाला सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत जाऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यांना उद्धव ठाकरेंना धक्का द्यायचा होता. त्यामुळे एकनाथ शिंदे आमच्याबरोबर आले आणि सरकार स्थापन केलं," असं त्यांनी यावेळी सांगितलं.

तर शरद पवार यांची राष्ट्रवादी फुटली नसती : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फुट पडल्यानंतर अजित पवार यांनी भाजपासोबत जाऊन हातमिळवणी केली. याबाबत रामदास आठवले यांना विचारलं असता ते म्हणाले की, "मी शरद पवारांना एनडीएसोबत येण्यास सांगत होतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुमचं कौतुक केलं आहे. जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारखे नेते भाजपासोबत आले, तर तुम्ही का येत नाही? शरद पवार आमच्यासोबत आले असते, तर ही फूट पडली नसती. आम्ही कोणाला तोडतो, असं अजिबात नाही. पण नेत्यांना दुसरा पर्याय दिसत नसल्यानं ते भाजपात येत आहेत," असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

हेही वाचा :

  1. 'मला देवेंद्र फडणवीस यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचं आश्वासन दिलंय' - रामदास आठवले - Ramdas Athawale met Fadnavis
  2. Ramdas Athawale PC : नव्या मित्रांमुळे जुन्या मित्रांना विसरू नका, रामदास आठवलेंचा भाजपाला खोचक टोला
  3. राहुल गांधींनी आधी काँग्रेस पक्ष सावरावा, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा खोचक सल्ला

Last Updated : Apr 5, 2024, 3:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.