ETV Bharat / bharat

रेल्वे असिस्टंट लोको पायलट भरती जाहीर होऊनही बिहारमध्ये विरोध, जाणून घ्या कारण - रेल्वेत 5 हजार 697 पदांसाठी भरती

Railway Recruitment Protest : गेल्या काही दिवसांपासून बिहारच्या विविध जिल्ह्यांमध्ये रेल्वे भरतीमध्ये वाढीव जागांबाबत गदारोळ सुरू आहे. पाटणा, नवादा, भागलपूरसह इतर जिल्ह्यांतून निदर्शने सुरू आहेत. त्यामुळं रेल्वे प्रशासनाच्या अडचणी वाढल्या आहेत. बिहारमधील विद्यार्थी रेल्वेतील भरतीबद्दल नाराज का आहेत, त्यांच्या मागण्या काय आहेत, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर रेल्वेमंत्री, बोर्डाचे काय म्हणणे आहे, जाणून घेऊया.

Railway Recruitment Protest
Railway Recruitment Protest
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 1, 2024, 10:00 PM IST

रेल्वे भरतीला विद्यार्थ्यांचा निषेध

पाटणा Railway Recruitment Protest : अलीकडंच, रेल्वे भर्ती बोर्डानं सहाय्यक लोको पायलटसाठी 5 हजार 697 पदांसाठी भरती जाहीर केली होती. 20 जानेवारीपासून भरतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरवात झाली आहे. मात्र, या भरतीबाबत विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. पाटणासह अनेक जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांनी निदर्शनं केल्यामुळं पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केल्याची घटना घडली आहे. त्यामुळं पोलिसांनी पाटण्यात अडीच हजार अनोळखी व्यक्तींविरोधा गुन्हे दाखल केले आहेत.

रेल्वेत 5 हजार 697 पदांसाठी भरती : रेल्वे भर्ती बोर्डानं सहाय्यक लोको पायलटच्या 5 हजाराहून अधिक पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. ज्यासाठी 20 जानेवारीपासून ऑनलाइन अर्ज करण्यास सुरवात झाली आहे. उमेदवारांची निवड CBT चाचणी म्हणजेच संगणकावर आधारित असेल. या पदासाठी किमान वयोमर्यादा 18 वर्षे तसंच कमाल 33 वर्षे ठेवण्यात आलं आहे. मात्र, राखीव प्रवर्गाला वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे. नवी अधिसूचना जारी करताना रेल्वेनं वयोमर्यादेत 3 वर्षांची शिथिलता देऊन विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

  • भरतीला विरोध का ? : रेल्वेनं केवळ 5 हजार 697 पदासाठी जाहिरात काढली आहे. 2018 मध्ये, जेव्हा रेल्वेनं 64 हजार 371 पदांसाठी भरती जाहीर केली होती, तेव्हा 2.5 कोटी फॉर्म आले होते. तेव्हापासून पदभरतीत वाढ करण्यात आलेला नाही. त्यामुळं रेल्वेनं जागा वाढवून द्याव्या, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

“सहा वर्षांपासून रेल्वेत भरती झालेली नाही. 2019 पासून फक्त कागदी घोडे नाचवण्यात येत आहे. लाखो उमेदवार मोठया प्रमाणावर रिक्त जागा निघण्याची वाट पाहत होते. मात्र केवळ 5 हजार 697 जागांची पद भरती जाहिरात काढण्यात आली आहे.'' - दीपक कुमार, उमेदवार, नवाडा

रेल्वेनं काढली 9 हजार पदांची भरती : विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, रेल्वेनं लोको पायलटसाठी केवळ 5 हजार 697 पदांची जाहिरात काढली आहे. डिसेंबर 2023 पर्यंत रेल्वेमध्ये 20 हजार पदे रिक्त आहेत, असं रेल्वे बोर्डानं म्हटलं आहे. त्यामुळं रेल्वे हुकूमशाही करत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. विद्यार्थ्यांच्या विरोधानंतर रेल्वे बोर्डानं आणखी 9 हजार तंत्रज्ञ पदांसाठी भरती जाहीर केली आहे. त्यामुळं आत रेल्वे एकून 14 हजार पदाची भरती करणार आहे, असं रेल्वेचं म्हणणं आहे.

“असे अनेक विद्यार्थी आहेत, ज्यांना सर्व जागासाठी फॉर्म भरता येत नाही. कारण त्यांच्याकडं एव्हढे पैसे नाहीत. 2014 पूर्वी फॉर्म भरण्यासाठी 100 रुपये लागत होते, आता त्याची किंमत 500 रुपये झाली आहे. रेल्वेच्या वेगवेगळ्या श्रेणींमध्ये 5-6 जागा रिक्त असतील, तर सर्व फॉर्म भरण्यासाठी विद्यार्थ्यांकडं पैसे नसतील.'' - नितीशकुमार, उमेदवार, पाटणा

  • 'आर्थिक बोजा वाढणार': रेल्वे भरतीची तयारी करत असलेले पाटणाचे नितीश कुमार म्हणतात, देशातील बेरोजगारीची स्थिती पाहा. अवघ्या 5-6 हजार जागांची भरती काढूण काय होणार? एवढ्या कमी रिक्त जागाची भरती करण्यासाठी काढलेली जाहिरात सरकारसाठी महसूल वाढवण्याचं साधन आहे. यामुळे गरीब विद्यार्थ्यांवर आर्थिक बोजा वाढत आहे.

हे वाचलंत का :

  1. हेमंत सोरेन यांची तुरुंगात रवानगी होताच चंपाई सोरेन यांचा सत्ता स्थापनेचा दावा, राज्यपालांची घेतली भेट
  2. लाल सिग्नल तोडून पुढं गेली शिवगंगा एक्स्प्रेस, प्रशासनाच्या सतर्कतेनं टळली ओडिशातील रेल्वे अपघाताची पुनरावृत्ती
  3. 'चार जातीं'वर लक्ष केंद्रीत करण्याची गरज; निर्मला सीतारामन यांनी स्पष्टच घेतली 'या' 'चार जातीं'ची नावं

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.