कटिहार (बिहार) Bharat Jodo Nyay Yatra : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची 'भारत जोडो न्याय यात्रा' आज बिहारमधून पुन्हा बंगालमध्ये दाखल होणार आहे. कटिहार शहरातील मिरचाईबारी इथून ही पदयात्रा शहीद चौक, डी एस कॉलेज आणि प्राणपूर मार्गे बिहार-बंगाल सीमेवर असलेल्या मालदा जिल्ह्यात प्रवेश करेल. या यात्रेमुळं काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाच वातावरण आहे.
राहुल यांनी श्री कृष्ण बाबूंना वाहिली श्रद्धांजली : या यात्रेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बिहारचे पहिले मुख्यमंत्री डॉ श्री कृष्ण बाबू यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहिली. त्यांचं स्मरण करुन त्यांनी x (पुर्वीचं ट्विटर) वर एक पोस्ट करत लिहिलंय की, "बिहारचे पहिले मुख्यमंत्री 'बिहार केसरी' डॉ, श्री कृष्ण सिंह यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन. बिहारच्या विकासात त्यांच्या योगदानासाठी ते आधुनिक बिहारचे निर्माते म्हणून सदैव स्मरणात राहतील."
-
बिहार के प्रथम मुख्यमंत्री 'बिहार केसरी' डॉ. श्रीकृष्ण सिंह जी की पुण्यतिथि पर उन्हें कोटिश: नमन।
— Bihar Congress (@INCBihar) January 31, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
राज्य के विकास में अद्वितीय योगदान के लिए श्रीबाबू जी को आधुनिक बिहार के निर्माता के रूप में हमेशा याद किया जाएगा। pic.twitter.com/fkgO73o5x9
">बिहार के प्रथम मुख्यमंत्री 'बिहार केसरी' डॉ. श्रीकृष्ण सिंह जी की पुण्यतिथि पर उन्हें कोटिश: नमन।
— Bihar Congress (@INCBihar) January 31, 2024
राज्य के विकास में अद्वितीय योगदान के लिए श्रीबाबू जी को आधुनिक बिहार के निर्माता के रूप में हमेशा याद किया जाएगा। pic.twitter.com/fkgO73o5x9बिहार के प्रथम मुख्यमंत्री 'बिहार केसरी' डॉ. श्रीकृष्ण सिंह जी की पुण्यतिथि पर उन्हें कोटिश: नमन।
— Bihar Congress (@INCBihar) January 31, 2024
राज्य के विकास में अद्वितीय योगदान के लिए श्रीबाबू जी को आधुनिक बिहार के निर्माता के रूप में हमेशा याद किया जाएगा। pic.twitter.com/fkgO73o5x9
नितीश कुमारांवर टिका : पूर्णियातील रंगभूमी मैदानावरील सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत ते म्हणाले, "थोडा दबाव आल्यावर नितीश जी यू-टर्न घेतात." नितीश कुमार भारतीय जनता पक्षाच्या चक्रव्यूहात अडकले आहेत, असा दावाही काँग्रेस नेते राहुल गांधींनी केलाय.
- राहुलसोबत दिसले डाव्या पक्षांचे नेते : पूर्णिया येथील जाहीर सभेत अनेक बड्या नेते राहुल गांधींसोबत व्यासपीठावर दिसले. राहुल यांच्यासोबत सीपीआयचे (एमएल) राष्ट्रीय सरचिटणीस दीपंकर भट्टाचार्य उपस्थित होते. तसंच छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, माजी मंत्री शकील अहमद आणि तारिक अन्वर हेही तिथं उपस्थित होते.
- राहुल गांधींनी घेतला फुटबॉल खेळण्याचा आनंद : या यात्रेदरम्यान राहुल गांधींचा एक व्हिडिओ समोर आलाय. यात ते स्थानिक तरुण खेळाडूंसोबत फुटबॉल खेळताना दिसत आहेत. कोडा येथील चेथरियापीरजवळ काही तरुण फुटबॉल खेळत होते. तिथून जात असताना राहुल तिथे थांबले. त्यांच्यासोबत फुटबॉल खेळण्याचा आनंद घेतला.
हेही वाचा :
- नितीशकुमार भाजपासोबत जाताच राहुल गांधींची 'भारत जोडो यात्रा' बिहारमध्ये, पूर्णियामध्ये घेणार जाहीर सभा
- सत्तापालट झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राहुल गांधींंची बिहारमध्ये 'भारत जोडो न्याय यात्रा', काँग्रेसनं आखली रणनीती
- राहुल गांधींवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक होणार? आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमांनी थेटच सांगितलं