ETV Bharat / bharat

पुण्यातील घरमालकाचे तीर्थयात्रेला नेण्याच्या बहाण्यानं अपहरण, भाडेकरू आरोपीला अटक

पुण्यातील घरमालकाचे झारखडंमधील आरोपीनं अपहरण केले. या आरोपीसह साथीदाराला झारखंड पोलिसांनी अटक केली आहे.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 14 hours ago

Police rescue abducted Pune businessman
पोलिसांनी आरोपीला केली अटक (Source- ETV Bharat Repoter)

रांची- पुणे येथील रहिवासी यशवंत हिरामण विनोद यांचे त्यांच्याच घरात राहणाऱ्या भाडेकरुन अपहरण केले. आरोपीचं नाव राजू झारखडंमधील मालदा येथील रहिवाशी आहे. त्याच्यासह साथीदाराला पोलिसांनी अटक केली.

अपहरण करण्यात आलेल्या यशवंत यांनी ४० खोल्या भाड्यानं दिल्या आहेत. त्यामधील एका खोलीत राजू हा गेल्या दीड वर्षांपासून राहत होता. राजूनं घरमालकाचा विश्वास जिंकून त्यांना तीर्थयात्रेला नेण्याच्या बहाण्यानं गंगासागर येथे नेले. तिथे साथीदारांच्या मदतीनं यशवंत यांचे अपहरण केले. त्यानंतर लपून ठेवण्यासाठी साहिबगंजच्या दियारा भागात नेले. पोलीस अधिकारी अमित सिंह म्हणाले, "अपहरण करणाऱ्यांनी यशवंत यांच्या मुलाला मोबाईलवरून फोन करून एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. यानंतर घाबरलेल्या मुलानं आरोपीविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी यशवंत यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलीस अधिकाऱ्यानं सांगितले की," रात्री साडेबारा वाजता मालदा जिल्ह्याच्या एसपींशी बोललो. त्यानंतर राजमहल एसडीपीओच्या नेतृत्वाखाली राजमहल, तीनपहार, राधानगर, बरहडवा आणि तळझारी या पाच पोलीस ठाण्यांच्या पोलिसांसह एक पथक तयार करण्यात आले."

तीन आरोपी फरार-जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणाले की, "आरोपीच्या मोबाईल लोकेशनवरून शोध सुरू होता. शेवटी पोलिसांच्या पथकानं बोटीने गंगा नदीत गस्त घातली. काही पथके साध्या वेशात डायरा परिसरात पोहोचली. यावेळी अपहरणकर्ता करण्याचे ठिकाण बदलत होता. मात्र, पोलिसांच्या पथकानं शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास छापा टाकून यशवंत हिरामण विनोदे यांची सुखरूप बाहेर काढली. पोलिसांनी घटनास्थळावरून दोन अपहरणकर्त्यांनाही अटक केली. यावेळी तीन आरोपी पाण्यात उडी मारून फरार झाले. या प्रकरणात सर्व आरोपींची ओळख पटली आहे." पुढे पोलीस अधीक्षक म्हणाले की," पुणे पोलीस साहिबगंजमध्ये पोहोचल्यानंतर अटक केलेल्या सर्व आरोपींना घेण्यात आले. अपहरण झालेल्या व्यक्तीला डिहायड्रेशनचा त्रास होता. त्यांच्यावर उपचार करण्यात आल्याची माहिती पोलिसांना दिली."

हेही वाचा-

  1. तलवारीनं केला जीवघेणा हल्ला; तरुणाच्या हाताची तुटली बोटं
  2. युवकाच्या हत्येमुळं अमरावतीत रोष; संतप्‍त नागरिकांचा पोलीस ठाण्‍यासमोर ठिय्या, अखेर दोन आरोपी जेरबंद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.