ETV Bharat / bharat

दिल्ली दारू घोटाळा; अरविंद केजरीवाल यांच्या घरी आजही धडकले पोलीस - अरविंद केजरीवाल

Delhi Liquor Scam : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी शुक्रवारी दिल्ली पोलीस धडकले होते. मात्र त्यांची भेट न झाल्यानं पोलीस आज पुन्हा अरविंद केजरीवाल यांच्या घरी पोहोचले आहेत.

Delhi Liquor Scam
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 3, 2024, 1:30 PM IST

नवी दिल्ली Delhi Liquor Scam : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयानं समन्स बजावलं होतं. मात्र दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईडी चौकशीकडं पाठ फिरवली आहे. शुक्रवारी दिल्लीचे पोलीस अरविंद केजरीवाल यांच्या घरी गेले होते. यानंतर शनिवारी पुन्हा पोलीस अरविंद केजरीवाल यांच्या धडकले आहेत. शुक्रवारी दिल्ली पोलीस अरविंद केजरीवाल यांच्या घरी धडकले होते, मात्र पोलिसांना त्यांची भेट होऊ शकली नाही.

दिल्ली दारू घोटाळ्यात आरोप : दिल्ली सरकारमध्ये मंत्री असलेल्या मनीष सिसोदिया यांना ईडीनं अटक केली होती. त्यानंतर ईडीनं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आतापर्यंत पाच समन्स पाठवले आहेत. मात्र अरविंद केजरीवाल यांनी ईडी चौकशीला दांडी मारली आहे. ईडीनं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आतापर्यंत 17 जानेवारी, 3 जानेवारी, 21 डिसेंबर, आणि 2 नोव्हेंबरला समन्स बजावलं होतं. मात्र ईडी सूडाची कारवाई करत असल्याचं स्पष्ट करत अरविंद केजरीवाल यांनी चौकशीला जाणं टाळलं होतं.

शुक्रवारी पोलिसांनी गाठवलं होतं अरविंद केजरीवाल यांचं घर : आम आदमी पक्षाचे नेते तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर विविध आरोप केले होते. भाजपा आम आदमी पक्षाचे आमदार फोडण्याची तयारी करत असल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला होता. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी चंदीगड महापौर निवडणुकीवरुन भाजपावर आरोप केले आहेत. त्या प्रकरणी आम आदमी पक्षानं भाजपाच्या मुख्यालयावर आंदोलन केलं आहे. दुसरीकडं दिल्ली दारू घोटाळ्यात ईडीनं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना समन्स बजावलं आहे. शुक्रवारी पोलिसांनी अरविंद केजरीवाल यांच्या दिल्लीतील घरी धाव घेतली. मात्र अरविंद केजरीवाल यांच्याशी त्यांची भेट होऊ शकली नाही.

चंदीगड महापौर निवडणुकीत हेराफेरी केल्याचा आरोप : चंदीगड महापौर निवडणुकीत काँग्रेसकडं बहुमत होतं. मात्र भाजपाचे 16 मतदार असतानाही भाजपाचा महापौर निवडून आला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणुकीत हेराफेरी केल्याचा आम आदमी पक्षानं आरोप केला होता. त्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवतं मान यांच्यासह आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी भाजपाच्या मुख्यालयावर आंदोलन केलं होतं.

हेही वाचा :

  1. गुन्हे शाखेचं पथक अरविंद केजरीवालच्या घरी पोहोचलं, वाचा काय आहे प्रकरण?
  2. चंदीगड महापौर निवडणूक प्रकरण : 'आप' आज भाजपाच्या मुख्यालयासमोर करणार आंदोलन, तगडी सुरक्षा तैनात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.