ETV Bharat / bharat

नरेंद्र मोदींची हॅट्रिक; चहा विक्रेता ते तीनवेळा पंतप्रधान होण्यापर्यंतचा मोदींचा प्रवास वाचा एका क्लिकवर - Narendra Modi PM Oath Ceremony - NARENDRA MODI PM OATH CEREMONY

Narendra Modi PM Oath Ceremony : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दूरदृष्टीसाठी ओळखले जातात. त्यांची काम करण्याची पद्धत तसंच सामान्य लोकांच्या समस्या सोडवण्याची क्षमता इतर राजकाण्यांपेक्षा वेगळी आहे. पंतप्रधान मोदींनी देशाची सूत्रे हाती घेण्यापूर्वी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्री होण्यापूर्वी मोदींचा प्रवास अगदी लहान वयातच सुरू झाला. जाणून घ्या नरेंद्र मोदींचा राजकीय प्रवास....

Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी (ETV BHARAT MH Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 9, 2024, 6:22 PM IST

Updated : Jun 9, 2024, 7:34 PM IST

नवी दिल्ली Narendra Modi PM Oath Ceremony : भारतीय राजकारणात नरेंद्र मोदींनी आपलं राजकीय कौशल्य, लोकप्रियता सिद्धच केली नाही, तर नवा विक्रमही प्रस्थापित केला आहे. रविवारी (9 जून) नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. याआधी नरेंद्र मोदी यांनी 2014, 2019 मध्ये पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. त्यांची ही सलग तिसरी टर्म आहे.

मोदींच्या हॅट्रिकनं देशवासीयांमध्ये उत्साह : ऐतिहासिकदृष्ट्या भारतीय राजकारणात मोदींनी आपलं राजकीय कौशल्याचा ठसा उमटवला आहे. नरेंद्र मोदींच्या या हॅट्ट्रिकनं देशवासीयांमध्ये नवा उत्साह दिसून येत आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएनं सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवली आहे. मोदींचं हे यश म्हणजे भारतीय राजकारणातील त्यांची मजबूत पकड तसंच लोकांमध्ये असलेली त्यांची अफाट लोकप्रियतेचा पुरावा आहे. आतापर्यंत त्यांच्या नेतृत्वाखाली देशानं अनेक महत्त्वपूर्ण धोरणात्मक सुधारणा, विकासाचे नवे आयाम पाहिले आहेत. आता 9 जून हा दिवस भारतीय राजकारणाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय म्हणून नोंदवला जाणार आहे.

पंतप्रधानांचं बालपण : पंतप्रधान नरेंद्र मोदी (नरेंद्र दामोदर दास मोदी) यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमधील वडनगरमध्ये झाला. त्यांच्या वडिलांचं नाव दामोदरदास मूलचंद मोदी तसंच आईचे नाव हिराबेन होतं. मोदींचे सुरुवातीचे शिक्षण वडनगर येथील भागवताचार्य नारायणाचार्य शाळेत झालं. लहानपणापासूनच त्यांना अभिनय, वादविवाद स्पर्धा, नाटकांमध्ये खूप रस होता. यामुळं त्यांनी शालेय काळात अनेक पुरस्कार पटकावले. शालेय शिक्षणादरम्यान ते एनसीसी कॅडेटही होते. यानंतर त्यांनी अमेरिकेत मॅनेजमेंट, पब्लिक रिलेशनशी संबंधित तीन महिन्यांचा कोर्सही केला, असं मोदींनी आपल्या विविध मुलाखतीत सांगितलंय.

वडिलांसोबत स्टेशनवर विकला चहा : मोदी लहान असताना वडिलांसोबत स्टेशनवर चहा विकायचे. याचा उल्लेख खुद्द पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात अनेकदा केला आहे. वडनगर रेल्वे स्टेशनवर मोदींच्या वडिलांची चहाची टपरी होती. तिथं मोदी वडिलांना मदत करायचे. यामुळेच त्यांना चायवाला पंतप्रधान असंही म्हटलं जातं. 1965 मध्ये भारत-पाक युद्धादरम्यान त्यांनी स्टेशनवरून जाणाऱ्या भारतीय सैनिकांना चहा दिला होता, असा दावा मोदींनी त्यांच्या भाषणात केलाय.

अध्यात्माच्या शोधात सोडलं घर : स्वत: पंतप्रधान मोदींनी विविध प्रसंगी त्यांच्या प्रवासाविषयी सांगितलं आहे. केदारनाथमध्ये जवळपास दीड महिना मुक्काम, पूजा आणि एकांतात ध्यान करण्याचा उल्लेख पीएम मोदींनी आपल्या अनेक भाषणात केला आहे. आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी देशाचा विविध भाग पिंजून काढला होता. राजकारणात आल्यानंतरही पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यांचा क्रम सुरूच आहे. नरेंद्र मोदी 1968 मध्ये अध्यात्माच्या शोधात कलकत्त्याला निघून गेले होते. त्यानंतर ते संन्यास घेण्याच्या उद्देशानं बेलूर मठात पोहोचले होते, परंतु रामकृष्ण मिशनचे स्वामी वीरेश्वरानंद यांनी त्यांना दीक्षा देण्यास नकार दिला. कारण त्यावेळी त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं नव्हतं.

PM मोदींचा राजकीय प्रवास : देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी हे PM मोदींचे राजकीय गुरू मानले जातात. 1985 मध्ये पंतप्रधान मोदींनी राजकारणात प्रवेश केला. मोदींची सक्रियता पाहून त्यांना लवकरच भाजपात मोठ्या जबाबदाऱ्या मिळू लागल्या. यानंतर मोदींनी मागे वळून पाहिलं नाही. 1995 मध्ये मोदींना भाजपाचे राष्ट्रीय सचिव बनवण्यात आलं.

2001 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री : 2001 च्या सुमारास गुजरातमध्ये भूकंप झाला. त्यामुळं राज्यात मोठा हाहाकार उडाला होता. या घटनेनंतर तत्कालीन मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. या घडामोडीनंतर मोदींना दिल्लीतून गुजरातला पाठवण्यात आलं. त्यानंतर मोदी पहिल्यांदाच गुजरातचे मुख्यमंत्री झाले. त्यांच्या चांगल्या कामांमुळं गुजरातच्या जनतेनं त्यांना सलग 4 वेळा (2001 ते 2014) गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून निवडून दिलं होतं.

2014 मध्ये पहिल्यांदा देशाचे पंतप्रधान : 2014 मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या. त्यावेळी एनडीएनं मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित केलं होतं. मोदींच्या झंझावातामध्ये या सार्वत्रिक निवडणुकीत एनडीएनं दणदणीत विजय मिळवला आणि मोदी देशाचे पंतप्रधान झाले. त्या काळात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान मोदींनी 282 जागा जिंकल्या. यानंतर 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा इतिहास रचत पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मोदी हे देशाचे पहिले पंतप्रधान आहेत, ज्यांनी लाल किल्ल्यावरून सलग नऊ वेळा देशाला संबोधित केलंय.

अनेक परस्कारांनी मोदींचा गौरव : जगातील अनेक देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या सर्वोच्च सन्मानानं सन्मानित केलंय. ग्रीसच्या भेटीदरम्यान, त्यांना देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार, ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनरनं सन्मानित करण्यात आलंय.

  • जुलै 2023 मध्ये, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मोदींना देशातील सर्वोच्च पुरस्कार, ग्रँड क्रॉस ऑफ द लीजन ऑफ ऑनरनं सन्मानित केलं.
  • जून 2023 मध्ये मोदींना इजिप्तनं ऑर्डर ऑफ द नाईल पुरस्कार प्रदान केलाय.
  • मे 2023 मध्ये, नरेंद्र मोदी यांना पापुआ न्यू गिनीकडून कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
  • मे मध्ये कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी हा पुरस्कार त्यांना देण्यात आला.
  • 2019 मध्ये, नरेंद्र मोदी यांना मालदीवमधील निशान इज्जुद्दीनच्या ऑर्डर ऑफ द डिस्टिंग्विश्ड रुलनं सन्मानित करण्यात आलं.
  • 2019 मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाचा ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू प्रदान पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • 2019 मध्ये, पंतप्रधानांना UAE द्वारे ऑर्डर ऑफ झायेद पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले.
  • 2018 मध्ये ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन पुरस्कारही मोदींना देण्यात आला.
  • 2016 मध्ये अफगाणिस्ताननं स्टेट ऑर्डर ऑफ गाझी अमीर अमानुल्ला खान तसंच पुन्हा 2016 मध्ये सौदी अरेबियाने ऑर्डर ऑफ अब्दुल अझीझ अल सौद पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलंय.

हे वाचलंत का :

  1. 'पैलवान ते केंद्रात मंत्री', खासदार मुरलीधर मोहोळ यांनी पहिल्याच टर्ममध्ये मंत्रीपद कसं मिळवलं? - Murlidhar Mohol
  2. मोदी 3.0 मध्ये राज्यातील कोणत्या खासदारांना लागणार मंत्रिपदाची लॉटरी, वाचा संभाव्य यादी - Cabinate Ministers
  3. शिंदे गटाच्या नेत्यांची बालीश बडबड; शिवसेनेच्या 'त्या' दाव्यावरुन ठाकरे गटाची टीका - Shivsena MPs

Last Updated : Jun 9, 2024, 7:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.