ETV Bharat / bharat

सरकारची तिसरी टर्म दूर नाही, काँग्रेसनं BSNL, MTNL, HL ला बरबाद केलं; राज्यसभेत पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 7, 2024, 3:47 PM IST

Updated : Feb 7, 2024, 4:29 PM IST

PM Narendra Modi : राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला चाळीशीचा आकडाही गाठता येणार नाही, असा दावा नरेंद्र मोदींनी केलाय.

Pm Narendra Modi
Pm Narendra Modi

नवी दिल्ली PM Narendra Modi : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर राज्यसभेत मोदींना काँग्रेसला चांगलंच फैलावर घेतल्याचं दिसून आलं. राज्यसभेत या चर्चेसाठी 14 तासांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. या चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलं. यावेळी त्यांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, राहुल गांधींसह काँग्रेसवर जोरदार टीका केली.

काँग्रेसचा दलितांच्या आरक्षणाला विरोध : सुरुवातीपासून काँग्रेसचा दलितांच्या आरक्षणाला विरोध असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलाय. काँग्रेसकडं ना नेते आहेत, ना नीती आहे, असा टोला देखील त्यांनी काँग्रेसला लगावलाय. आदिवासी महिलेला राष्ट्रपती बनवण्यासाठी काँग्रेसनं विरोध केला, भाजपानं देशाला 10 वर्षात संकटातून बाहेर काढलं, असं देखील मोदींनी म्हटलं आहे. तसंच भाजपामुळं जम्मू-काश्मिरात दलितांना आरक्षण मिळाल्याचा दावाही मोदींनी केलाय.

आदिवासींसाठी दोन विद्यापीठं स्थापन : भाजपानं आदिवासींसाठी दोन विद्यापीठं स्थापन केली, उच्च शिक्षणात दलित विद्यार्थ्यांच्या आकडेवारीत वाढ झाल्याचं मोदींनी सभागृहाला सांगितलं. मात्र, गेली 70 वर्ष काँग्रेसनं काश्मिरात दलित, ओबीसी, एससी, एसटीला वंचित ठेवल्याचा आरोप मोदींनी केलाय. तसंच माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंचा आरक्षणाला विरोध असल्याचा टोला त्यांनी काँग्रेसला लगावलाय. देशात नैराश्य पसरण्याचं काम काँग्रेस करत आहे. काँग्रेस स्वत: निराशेत आहे. त्यामुळं ते देशाचं काहीच भल करू शकत नाही. आता देशात मोदींच्या गॅरंटीचा काळ सुरू आहे, असा दावा मोदींनी बोलताना केलाय.

BSNL, MTNL, HL ला काँग्रेसनं बरबाद केलं : "सब का साथ सब का विकास" हीच मोदींची गॅरंटी आहे. BSNL, MTNL, HL ला काँग्रेसनं बरबाद केलं, एअर इंडियाला कोणी बरबाद केलं? असा सवाल मोदींनी विरोधकांना केला. भाजपा सरकारच्या काळात BSNL, HL, MTNL नं प्रगती केली, असंही मोदी म्हणाले. LIC बाबत देखील चुकीची माहिती काँग्रेसनं पसरवल्याचा आरोप मोदींनी केलाय. मात्र, भाजपाच्या काळात MTNL नं देशात सर्वाधित उत्पादन केलं. तसंच LIC देखील भाजपामुळं उच्च स्थानावर पोहचलीय. देशात LIC च्या शेअरनं नवे विक्रम केले असं मी अभिमानानं सांगतो, असंही मोदी म्हणाले.

युवरांजांसाठी काँग्रेसचं स्टार्टअप : पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना युवराज म्हणत त्यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. युवरांजांसाठी काँग्रेसनं स्टार्टअप सुरू केलं होतं. मात्र, ते ना लाँचं झाले, ना ते लिफ्ट झाले, असा टोला त्यांनी राहुल गांधींना लगावला. कोविडच्या काळात राज्यातील प्रमुखांशी 20 बैठका घेतल्या, त्यामुळं केंद्रासह राज्य सरकारनं देखील देशाला वाचण्यात यश मिळवलं. देशात G20 परिषदेचं आयोजन केलं. प्रत्येक राज्याला या परिषदेत काम करण्याची संधी मिळाली, असं मोदींनीे सभागृहाला सांगितलं. विदेशातील पाहुणे आल्यावर मी त्यांना देशातील एका राज्यात घेऊन जातो, फ्रान्सच्या राष्ट्रपतींना देखील 25 जानेवारीला मी राजस्थानच्या विविध भागात फिरवलं. सर्व राज्यांना त्यांचे अधिकार देण्याची आमची भूमिका आहे. एक देश आमच्यासाठी फक्त जमिनीचा तुकडा नाही, देशाला एकसंघ ठेवण्यासाठी आमची जबाबदारी असल्याचं" ते म्हणाले.

आमच्या सरकारची तिसरी टर्म : देशात 25 करोड नागरिक गरिबीतून बाहेर आले. गरिबांना 5 लाखांची आरोग्य योजना यापुढंही सुरू राहील, शेतकऱ्यांना किसान सम्मान निधी सुरू राहील, गरिबांना घर देण्याची सुविधा सुरूच राहणार आहे, आमच्या सरकारची तिसरी टर्म दूर नाही, पुढील 5 वर्षात डॉक्टरांची संख्या वाढवण्यात येणार आहे, PM आवास योजनेपासून कोणीही वंचित राहणार नाही, ही मोदींची गॅरंटी आहे. मध्यम वर्गाच्या लाखो विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देशात मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मोदी म्हणाले. आत्मनिर्भर भारत, बुलेट ट्रेन, खेळ, गरिबांना औषध, संशोधन, उर्जा, सार्वजनिक वाहतूक, इथोनॉल, वीज, खाद्यतेल, नैसर्गिक शेती, पर्यावरण, 15 ड्रोन शेतीसाठी, नॉनो टेक्नॉलॉजी, सहकार क्षेत्र, पशुपालन, मत्सपालन, पर्यंटन, डिजिटल भारत, खगोलशास्त्र, अर्थशास्त्र, अशा विविध क्षेत्रावर पुढील पाच वर्षात काम करणार असल्याचं यावेळी मोदी म्हणाले.

हे वाचलंत का :

  1. पुण्यातील हिरे व्यापाऱ्याची गुवाहाटीतील हॉटेलमध्ये हत्या, बंगाली जोडप्याला अटक; वाचा फिल्मी स्टाईल कहाणी
  2. फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; 7 जणांचा मृत्यू, 42 हून अधिक गंभीर जखमी
  3. ईडीची मोठी कारवाई, 'आप'च्या बड्या नेत्यांच्या ठिकाणांवर एकाचवेळी छापेमारी

Last Updated : Feb 7, 2024, 4:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.