ETV Bharat / bharat

पंतप्रधान मोदींचे एक्स सोशल मीडियावर 10 कोटी फॉलोअर्स, राहुल गांधींचे किती आहेत फॉलोअर्स? - PM Narendra Modi X followers - PM NARENDRA MODI X FOLLOWERS

PM Modi 100M Followers On X : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फॉलोअर्सची संख्या आता 100 म‍िल‍ियन (10 कोटी) पार झालीय. त्यामुळं पंतप्रधान मोदींनी आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासारख्या अनेक जागतिक नेत्यांना मागं टाकलंय. त्यांच्या तुलनेत इतर नेते खूप मागे आहेत.

PM Narendra Modi becomes most followed global leader on X with 100 million followers
पंतप्रधान मोदींचे एक्सवर 10 कोटी फॉलोअर्स (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 15, 2024, 8:52 AM IST

नवी दिल्ली PM Modi 100M Followers On X : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रविवारी (14 जुलै) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) 100 दशलक्ष (10 कोटी) फॉलोअर्स पूर्ण केलेत. यासह, त्यांनी सर्वाधिक फॉलो केले जाणारे जागतिक नेते बनून एक नवीन मैलाचा दगड गाठलाय. पंतप्रधान मोदींनी आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (38.1 दशलक्ष फॉलोअर्स), दुबईचे शासक शेख मोहम्मद (11.2 मिलियन फॉलोअर्स) आणि पोप फ्रान्सिस (18.5 मिलियन फॉलोअर्स) यांसारख्या जागतिक नेत्यांना मागं टाकलंय.

पंतप्रधान मोदींनी पोस्ट करत मानले आभार : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, “एक्सवर 100 दशलक्ष फॉलोअर्सचा टप्पा पार केला. या नव्या माध्यमावर आल्यानंतर चर्चा, वादविवाद, लोकांच्या शुभेच्छा तसंच विधायक टीका आणि इतर संदेश वाचून आनंद वाटला. भविष्यातही या माध्यमावर आणखी आनंद मिळेल, अशी अपेक्षा करतो.”

पंतप्रधान मोदी हे भारतीय राजकारण्यांपेक्षा पुढं : भारतात पंतप्रधान मोदींचे फॉलोअर्स इतर भारतीय राजकारण्यांपेक्षा अधिक आहेत. एक्सवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे 26.4 दशलक्ष फॉलोअर्स आहेत, तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे 27.5 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तसंच पंतप्रधान मोदी हे समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (19.9 दशलक्ष), पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (7.4 दशलक्ष), राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद आणि शरदचंद्र पवार पक्षांचे प्रमुख शरद पवार (2.9 दशलक्ष) यासारख्या इतर विरोधी नेत्यांपेक्षा कितीतरी अधिक पुढे आहे.

हेही वाचा -

  1. अनंत अंबानी राधिका मर्चंट यांना पंतप्रधान मोदींनी दिले आशीर्वाद; विवाह सोहळ्यातील धार्मिक कार्याला हजेरी - Pm Modi In Anant Radhika Wedding
  2. मुंबईबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं स्वप्न; विरोधकांचा घेतला खरपूस समाचार - PM Narendra Modi in Mumbai
  3. मोदी-पुतिन यांची भेट : तापलेल्या जागतिक परिस्थितीमध्ये भारत रशिया चिरस्थायी आणि घनिष्ट संबंधाचे संकेत - Modi Putin Bonhomie

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.