अहमदाबाद- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादच्या रानिप मतदान केंद्रावर आज मतदान केले. मतदान केल्यानंतर त्यांनी जनतेला मतदान करण्याचं आवाहन केलं. त्यांनी म्हटलं, " मतदान हे सामान्य दान नाही. लोकशाहीसाठी लोकांनी मतदान करावे. पत्रकारांनी आरोग्याची काळजी घ्यावी. दुपारनंतर महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि तेलंगणात सभा आहेत."
सिया पटेल या चिमुकलीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोट्रेट दिलं. त्यावर त्यांची सही घेतली. या अनुभवाबाबत ती म्हणाली," मी पंतप्रधान यांना ऑटोग्राफ मागितला. मी या दिवसाची वाट पाहत होते. हा अनुभव शब्दात वर्णन करू शकत नाही. देवर्ष पंड्या या विद्यार्थ्यानं पंतप्रधान मोदींचे स्केच काढून त्यांना दिले. त्यावर देवर्ष म्हणाला,, "मी पंतप्रधान मोदींना चित्र कसे आहे, ते विचारले. त्यांनी चांगलं असल्याच सांगितलं. त्यांनी त्यावर स्वाक्षरीही केली. मी काल रात्री हे स्केच रेखाटले. अहमदाबाद मतदान केंद्रावर मतदान केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी तेथील नागरिकांशी संवाद साधला. एका बाळाला हातात घेतले.
महाराष्ट्रात या दिग्गजांनी बजाविला मतदानाचा हक्क
- साताऱ्यातील महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले, राजमाता कल्पनाराजे भोसले, दमयंतीराजे भोसले यांनी मतदानाचा हक्क बजावला.
- साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि त्यांच्या पत्नी अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी मतदानाचा हक्क बजावून ते आपल्या प्रशासकीय कर्तव्यासाठी सज्ज झाले.
- भाजपाचे सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले आणि त्यांच्या पत्नी गौरवी भोसले यांनी कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथे मतदान केले.
- राष्ट्रवादी काँग्रेसचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभाताई यांनी बारामतीत मतदान केले. बारामती लोकसभेत तीनवेळा खासदार राहिलेल्या सुप्रिया सुळे यांची मुलगी रेवती या पहिल्यांदाच मतदान करणार आहेत.
- बॉलीवूड अभिनेता रितेश आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांनी लातूरमध्ये मतदान केलं. आमदार अमित देशमुख आणि धीरज देशमुख, त्यांची आई वैशाली विलासराव देशमुख यांनीदेखील मतदान केलं.
- रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील भाजपाचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे, त्यांच्या पत्नी आणि त्यांची मुले आमदार नितेश राणे आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी मतदान केले.
- अजित पवार यांनी काटेगाव येथील मतदान केंद्रावर येऊन मतदान केले. त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या बारामतीच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवित आहेत.
हेही वाचा-