मुंबई Lok Sabha Election 2024 : मुंबईत केंद्रीय मंत्री आणि मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार पीयूष गोयल यांनी आज मॉर्निंग वॉक दरम्यान लोकांची भेट घेतली. लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर मुंबईत २० मे रोजी मतदान होणार आहे. ते म्हणाले, " महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला साथ देण्याचा संकल्प केलाय. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर विकास होत आहे. देश सुरक्षित आणि समृद्धीकडं वाटचाल करत आहेत."
याआधी निवडणुकीत भाजपानं 25 पैकी 23 जागा जिंकल्या : गोपाळ शेट्टी हे मुंबई उत्तरमधून दोन वेळा खासदार राहिले आहे. त्यांनी 2014 आणि 2019 मध्ये मुंबई उत्तर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. उत्तर प्रदेशनंतर या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीचा पहिला आणि दुसरा टप्पा संपला आहे. पहिला टप्पा १९ एप्रिलला, तर दुसरा टप्पा २६ एप्रिलला पार पडला. त्यानंतर महाराष्ट्रात 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी निवडणुका होणार आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपानं 25 पैकी 23 जागा जिंकल्या होत्या. तर शिवसेनेला 23 पैकी 18 जागा मिळाल्या होत्या. .
4 जून रोजी होणार मतमोजणी : राष्ट्रवादी काँग्रेसनं 19 जागा लढवून चार जिंकल्या होत्या. 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे गटानं भाजपाशी हातमिळवणी केली. तर राज्यात 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.
हेही वाचा -