अमरावती : सुप्रसिद्ध अभिनेते तथा आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांना सोमवारी अज्ञात व्यक्तीनं ठार मारण्याची धमकी दिली आहे. पवन कल्याण यांच्या कार्यालयात कॉल करुन त्यांना ही धमकी देण्यात आली. यावेळी या कॉलरनं आक्षेपार्ह संदेशही पाठवल्याची माहिती पवन कल्याण यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. त्यांच्या जनसेना पक्षाच्या वतीनंही पवन कल्याण यांना ठार करण्याची धमकी मिळाल्याचं सोमवारी स्पष्ट करण्यात आलं आहे.
पवन कल्याण यांना धमकी मिळाल्यानं खळबळ : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांना अज्ञात कॉलरनं ठार मारण्याची धमकी दिली आहे, अशी माहिती जनसेना पक्षानं आपल्या सोशल माध्यमातून दिली आहे. अज्ञात कॉलनं पवन कल्याण यांच्या कार्यालयात कॉल करुन ही धमकी दिली. कॉलरनं आक्षेपार्ह मॅसेज देखील पाठवला, असं जनसेना पक्षानं सोमवारी स्पष्ट केलं. "पवन कल्याण यांच्या कार्यालयात आगंतकुडी इथून धमकीचे फोन आले. अज्ञात कॉलरनं पवन कल्याण यांना ठार मारलं जाईल, अशी धमकी दिली. कॉलरनं पवन कल्याण यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषा वापरून मॅसेज पाठवले," असं जनसेना पक्षानं सोशल माध्यमात शेयर केलेल्या पोस्टमध्ये स्पष्ट केलं आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली माहिती : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांना ठार मारण्याची दमकी मिळाल्यानं मोठी खळबळ उडाली. याबाबत पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाच्या वतीन या धमकीची गंभीर दखल घेण्यात आली. धमकी मिळाल्यानंतर तत्काळ या धमकीची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली, असं पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं.
हेही वाचा :
- बाळासाहेब ठाकरेंचं स्मरण, पंढरीची वारी अन् महायुतीचा प्रचार...चंद्रपुरातील सभेदरम्यान नेमकं काय म्हणाले पवन कल्याण?
- महायुतीच्या उमेदवारांसाठी पवन कल्याण महाराष्ट्रात, मराठीतून केली भाषणाला सुरुवात; म्हणाले...
- आंध्रचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण करणार 11 दिवसांचा उपवास; म्हणाले, "विश्वासघात झाल्यासारखं..." - Tirupati Prasad Row