ETV Bharat / bharat

ओमर अब्दुल्ला जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री पदी विराजमान; पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा - CHIEF MINISTER OMAR ABDULLAH

ओमर अब्दुल्ला यांनी आज (16 ऑक्टोबर) जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. केंद्रशासित प्रदेशाचे ते पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत.

CHIEF MINISTER OMAR ABDULLAH
ओमर अब्दुल्ला जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 16, 2024, 8:55 PM IST

श्रीनगर : नॅशनल कॉन्फरन्सचे (NC) उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी आज (16 ऑक्टोबर) जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ते या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. श्रीनगर येथील शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर येथे हा कार्यक्रम झाला. शपथविधी सोहळ्यासाठी राहुल गांधी, प्रियांका गांधी, सपा प्रमुख अखिलेश यादव, आप नेते संजय सिंह यांच्यासह 6 पक्षांचे नेते उपस्थित होते.

पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओमर अब्दुल्ला यांचं अभिनंदन केलय. त्यांनी म्हटलं की, "जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेल्याबद्दल ओमर अब्दुल्ला यांचं अभिनंदन. लोकांची सेवा करण्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा."

केंद्रशासित प्रदेशातील पहिल्या सरकारचं अभिनंदन : जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री कविंदर गुप्ता म्हणाले, "जम्मू-काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशातील पहिल्या सरकारचं मला अभिनंदन करायचं आहे. मला आशा आहे की ते जम्मू-काश्मीरचा विकास करतील.

पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या, "जम्मू-काश्मीरला अनेक वर्षांनी स्वतःचं सरकार मिळालय. 2019 नंतर जम्मू-काश्मीरच्या लोकांना खूप त्रास सहन करावा लागला. आता स्थापन झालेलं सरकार सर्व जखमा भरून काढणार.

ओमर अब्दुल्ला मुख्यमंत्री झाल्याचा आम्हाला आनंद : ओमर अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, "मी त्यांचे अभिनंदन करतो. आमच्या मित्रपक्षाचा मुख्यमंत्री झाल्याचा आम्हाला आनंद आहे."

कोण आहेत ओमर अब्दुल्ला? : ओमर अब्दुल्ला यांनी 1998, 1999 आणि 2004 मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये श्रीनगर मतदारसंघातून निवडून येऊन आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी 2002 मध्ये नॅशनल कॉन्फरन्सचं प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारला. 2009 मध्ये ओमर अब्दुल्ला जम्मू-काश्मीरचे सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री बनले. 2015 पर्यंत ते मुख्यमंत्री या पदावर होते. ओमर अब्दुल्ला यांचे वडील फारुख अब्दुल्ला तसंच आजोबा शेख अब्दुल्ला हे दोघंही जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री राहिले आहेत.

हेही वाचा

  1. गांधी घराण्यातून तिसरा खासदार? प्रियंका गांधी 'या' मतदारसंघातून लढणार निवडणूक
  2. "तुमच्यावर विश्वास नाही"; कॅनडातील उच्चायुक्तांना भारतानं बोलावलं परत
  3. बाबा सिद्दीकींच्या हत्येचं 'यूपी' कनेक्शन; आरोपी पुण्यात करायचे काम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.