अमृतसर Nihang Sikh Attack : निहंगांच्या वेशात आलेल्या 3 हल्लेखोरांकडून पंजाबच्या लुधियानामध्ये शिवसेना नेते संदीप थापर गोरा यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचा भाजप नेत्या लक्ष्मीकांता चावला यांनी निषेध केला." या घटनेचा हिंदू किंवा शीखांशी संबंध जोडू नका, असं त्यांनी जनेतला आवाहन केलं आहे.
निहंगासारख्या वेशभूषेत आलेले गुन्हेगार : पंजाबचे शिवसेना नेते संदीप थापर यांच्यावरील हल्ल्याबाबत भाजप नेत्या लक्ष्मी कांता चावला म्हणाल्या की, "निहंगांच्या वेशात आलेल्या हल्लेखोरांकडून संदीप थापर यांच्यावर हल्ला करण्यात आला. ते निहंग होते? की निहंगासारख्या वेशभूषेत आलेले गुन्हेगार होते? हे सरकारनं सांगावं. भररस्त्यात असा प्राणघातक हल्ला होणं धक्कादायक आहे. लुधियानाच्या पोलीस उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, "शुक्रवारी सकाळी 11:30 च्या सुमारास तीन अज्ञात व्यक्तींनी पंजाब शिवसेना नेते संदीप थापर यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. आरोपींची ओळख पटली असून त्यांना लवकरच अटक केलं जाईल," असं पोलीस उपायुक्तांनी सांगितलं.
- दोन आरोपींना अटक : "या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसरात अलर्ट जारी केलाय. आम्ही सरबजीत सिंग आणि हरजोत सिंग या दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपी तहल सिंग हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे." असं लुधियानाचे सीपी पोलीस कुलदीप सिंग चहल यांनी सांगितलं.
मुख्यमंत्र्यांना पोटनिवडणुकीची चिंता : शिवसेना नेते संदीप थापर यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर त्यांची प्रकृती विचारण्यासाठी सुनील जाखड शुक्रवारी डीएमसी रुग्णालयात आले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना भाजपा नेते सुनील जाखड यांनी चिंता व्यक्त केली. पंजाबमध्ये अशा घटनांचे प्रमाण वाढत असल्याचं त्यांनी सांगितले. भाजपा नेते सुनील जाखड म्हणाले, " मुख्यमंत्री भगवंत मान गप्प बसले आहेत. त्यांना जालंधर पोटनिवडणुकीची चिंता आहे. घटनेला एक दिवस उलटून गेला आहे. मात्र यावर ते काहीच बोलत नाही. गुन्हेगारी नियंत्रणात हे सरकार अपयशी ठरले आहे."
हेही वाचा