ETV Bharat / bharat

वृत्तवाहिनीच्या अँकरला मारहाण, कपडेही फाडल्याचा आरोप; दिल्ली देहराडून महामार्गावर नराधमांचं 'तांडव' - News Channel Anchor Molested - NEWS CHANNEL ANCHOR MOLESTED

News Channel Anchor Molested : आपल्या बहिणींसोबत रुरकीला जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोन नराधमांनी त्यांची छेडछाड करुन त्यांना मारहाण केली. यावेळी नराधमांनी वृत्तवाहिनीच्या अँकरचे कपडे फाडल्याचा आरोपही या पीडितांनी केला.

News Channel Anchor Molested
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 11, 2024, 11:00 AM IST

चंदीगड News Channel Anchor Molested : वृत्तवाहिनीच्या निवेदिकेचे कपडे फाडून नराधमांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार दिल्ली देहराडून महामार्गावर हरिद्वार जिल्ह्यात घडला. या घटनेमुळे देशभरात मोठी खळबळ उडाली असून पीडित वृत्तवाहिनीच्या अँकरच्या तक्रारीवरुन पोलिसांनी दोन नराधमांविरोधात गुन्हा दाखल केला. अर्जुन आणि शिवम असं या घटनेत अटक करण्यात आलेल्या या दोन नराधमांची नावं आहेत. या दोन्ही नराधमांना अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दुचाकीस्वारांनी अँकरसह तिच्या बहिणीला केली मारहाण : देहराडूनमधील एका वृत्तवाहिनीत अँकर असलेली पीडिता तिच्या बहिणीसह रुरकीला रविवारी कारनं जात होती. यावेळी हरिद्वार जिल्ह्यातील बुग्गावाला पोलीस ठाण्याच्या परिसरात दिल्ली देहराडून महामार्गावर दुचाकीस्वारांनी त्यांचा पाठलाग केला. दोन्ही नराधमांनी बुग्गावाला पोलीस ठाण्याच्या परिसरातील अमानतगड गावाजवळ दुचाकी कारच्या पुढं आडवी लावली. त्यामुळे अँकरला आपली गाडी थांबवावी लागली. यावेळी या दोन्ही नराधमांनी अंकरसह तिच्या बहिणीशी छेडछाड करण्यास सुरुवात केली. यावेळी या दोन्ही तरुणींनी या नराधमांना विरोध केला असता, त्यांनी कारची तोडफोड करत अंकरचे कपडे फाडल्याचा आरोप पीडितेनं केला आहे. नराधमांनी मारहाण केल्यानंतर या पीडितांनी बुग्गावाला पोलीस ठाण्यातील चेक पोस्टवर धाव घेत तक्रार दाखल केली.

पोलिसांनी ठोकल्या नराधमांना बेड्या : नराधमांनी अंकर तरुणीची छेडछाड करत मारहाण करुन कपडे फाडल्यानं मोठी खळबळ उडाली. या तरुणींना मारहाण झाल्याची घटनेची माहिती मिळताच बुग्गावाला पोलिसांनी तत्काळ घटनास्थळावर धाव घेतली. पोलिसांनी यातील एका नराधमाला अटक केलं, तर दुसरा नराधम घटनास्थळावरुन पळून जाण्यात यशस्वी झाला. बुग्गावाला पोलिसांनी त्याला सोमवारी अटक केली. अटक करण्यात आलेल्या नराधमांची नावं अर्जुन आणि शिवम असून ते इस्माईलपूरचे रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा :

  1. मित्राच्या मुलीवरच पोलीस निरीक्षकाची वाईट नजर, चक्क न्यूड फोटोची मागणी केल्याचा आरोप - Molestation Case Against PI
  2. गुवाहाटीला आमदारांना मारहाण आणि एअर हॉस्टेसचा विनयभंग कोणी केला? असिम सरोदेंचा सवाल
  3. पुण्यात कोरियन युट्युबरची छेड काढणाऱ्या गुंडाला अटक, सोशल मीडियावर व्हिडिओ झाला होता व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.