NEET UG Paper Leak 2024 : नीट परीक्षा आणि त्याचा निकाल याबाबत वाद सुरूच आहे. सर्वोच्च न्यायालयानं मंगळवारी (18 जून 2024) नॅशनल टेस्टिंग एजन्सीला नोटीस बजावून 8 जुलै रोजी उत्तर देण्यास सांगितलं. पाटणा येथील एनएचएआयच्या गेस्ट हाऊसमध्ये अनेक उमेदवारांना नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आधीच मिळाल्या होत्या. पाटणा विमानतळासमोरील एनएचएआयच्या गेस्ट हाऊसच्या खोली क्रमांक 404 मध्ये अनेक विद्यार्थ्यांना ठेवण्यात आलं होतं. याप्रकरणी पोलिसांनी एका विद्यार्थ्याला अटक केली आहे.
पोलिसांनी विद्यार्थ्यांना संशयाच्या आधारे नोटिसा बजावल्या होत्या. या विद्यार्थ्यांनी पोलिसांसमोर अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आयुष राज, अभिषेक कुमार आणि शिवानंदन कुमार या विद्यार्थ्यांना परीक्षेची उत्तरं आधीच मिळाली होती. मात्र, या तिघांनाही परीक्षेत गुणवत्ता यादीत स्थान मिळवता आलं नाही.
गेस्ट हाऊसमध्ये राहण्याची सोय : पाटणाच्या एनएचएआय गेस्ट हाऊसमध्ये अनेक उमेदवारांना नीट परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आधीच मिळाल्या होत्या. पाटणा विमानतळासमोरील एनएचएआय गेस्ट हाऊसच्या खोली क्रमांक 404 मध्ये अनेक विद्यार्थ्यांना ठेवण्यात आलं होतं. उमेदवाराच्या राहण्याची व्यवस्था सिकंदर नावाच्या व्यक्तीनं केली होती. पोलिसांनी एका विद्यार्थ्याला अटक केली आहो. तो त्याची आई रीना आणि इतर काही उमेदवारांसह त्याच खोली राहत होता.
9 आरोपींना नोटीस : बिहार आर्थिक गुन्हे शाखेकडून नीट पेपर लीक प्रकरणात संशयित विद्यार्थ्यांची सलग दुसऱ्या दिवशी आज चौकशी करण्यात येणार आहे. आर्थिक गुन्हे शाखेनं 9 जणांना नोटीस पाठवून त्यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. पाटणा पोलिसांनी नीट परीक्षेदरम्यान लर्न प्ले स्कूलवर छापा टाकला होता, जिथं 13 उमेदवारांचे रोल कोड आणि नंबर सापडले होते. त्यापैकी चौघांना घटनास्थळावरून अटक करण्यात आली. परंतु अद्याप 9 जण सापडले नाहीत. आता आर्थिक गुन्हे शाखेनं या 9 संशयितांना नोटीस पाठवली. त्यांना 18 आणि 19 जून रोजी कार्यालयात चौकशीसाठी बोलावलं आहे.
उमेदवारांकडून 30 लाख रुपयांची मागणी : नीट पेपर लीक प्रकरणाची बिहार आर्थिक गुन्हे युनिट चौकशी करत आहे. तपासादरम्यान एजी कॉलनी लालू खताळ, पाटणाजवळील भाड्याच्या घरातून एटीएम कार्ड्स आणि विविध बँकांचं पासबुक जप्त केले आहेत. तसेच उमेदवारांकडून प्रत्येकी 40 लाख रुपयांची मागणी करण्यात आल्याचा संशय आहे.
हेही वाचा
- रिलायन्स जिओचं नेटवर्क डाऊन; वापरकर्त्यांना बसला फटका, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस - Reliance Jio Down
- अलका याज्ञिक यांची श्रवणशक्ती गेली... संगीत क्षेत्राला धक्का, गायिकेनं स्वतःच केला खुलासा - ALKA YAGNIK LOST HER HEARING
- इंडिया आघाडीतील घटक पक्षांशी चर्चा करा, लोकसभा सभापती निवडीवर पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया - Maharashtra Breaking News Live