ETV Bharat / bharat

नीट पेपर लीक प्रकरण: चौथी पास ट्रॅक्टर चालकाला अटक, जाणून घ्या त्याचा कसा आहे सहभाग ? - NEET Paper Leak Case

NEET Paper Leak Case: नीट परीक्षेचा पेपर फुटल्याप्रकरणी एका ट्रॅक्टर चालकाला बिहारच्या रोहतास जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर या प्रकरणाची संपूर्ण गावात चर्चा होत आहे.

NEET Paper Leak Case
NEET Paper Leak Case (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 22, 2024, 10:13 AM IST

Updated : Jun 22, 2024, 12:02 PM IST

रोहतास NEET Paper Leak Case : नीट पेपर लीकचं प्रकरण बिहारमधील अनेक जिल्ह्यांशी जोडलेलं आहे. मुझफ्फरपूरनंतर आता रोहतास कनेक्शनही समोर आलं आहे. शुक्रवारी पोलिसांनी 13 आरोपींपैकी 38 वर्षीय बिट्टू सिंगला अटक केली. पोलिसांनी अटक केलेला बिट्टू हा सिकंदर यदुवेंद्रचा वैयक्तिक चालक असल्याचं सांगण्यात येत आहे.

नीट पेपर लीक प्रकरणी चौथी पास ट्रॅक्टर चालकाला अटक (ETV BHARAT Repoter)

नीट पेपर लीकचं रोहतास कनेक्शन : बिट्टू सिंग कुमार गारनोखा येथील रहिवासी आहे. नीट पेपर लीक प्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे. बिट्टू कुमार हा ट्रॅक्टर चालक म्हणून काम करतो, असं त्याच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो पाटण्यात खासगी चालक म्हणून काम करत होता. नीट पेपर प्रकरणात त्याची नेमकी चूक काय? असा प्रश्न बिट्टूच्या कुटुंबीयांना पडला आहे.

बिट्टू शिकलेला नाहीय : बिट्टू सिंग शिकलेला नसल्याचं कुटुंबीय सांगतात. पूर्वी तो गावातच ट्रॅक्टर चालवत असे. नंतर तो पाटण्यात कोणाचा तरी कार चालक झाला. त्यांची मुले आणि कुटुंबीय गावातच राहतात. गावातील लोकांचं म्हणणं आहे, की, "त्याला नीटच्या पेपर सारख्या विषयांची माहिती नाहीय. बिट्टू शिकलेला नाहीय. तिसरी-चौथीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर तो गावात ट्रॅक्टर चालवत असे. काही वर्षांपूर्वी पाटण्यात राहत असताना त्यानं कोणाची तरी गाडी चालवायला सुरुवात केली.''

"बिट्टू आधी गावातच ट्रॅक्टर चालवायचा. त्याचं शिक्षण फार कमी आहे. पाटण्यात राहून त्यानं गाडी चालवायला सुरुवात केली. नीट पेपर लीक प्रकरणात त्याचा काहीही सहभाग नाही. त्याला गोवण्यात आलं आहे, तो निर्दोष आहे." -सुरेंद्र सिंह, बिट्टू कुमारचा भाऊ

NEET प्रकरणात अनेकांना अटक : 5 मे रोजी नीट 2024 ची परीक्षा देशभरातील अनेक केंद्रांवर घेण्यात आली. परीक्षेच्या दिवशीच पेपरफुटीचं प्रकरण समोर आलं. या प्रकरणी पोलिसांनी पाटणा येथील एका केंद्रातून जळालेली प्रश्नपत्रिका जप्त केली. बिहार आणि झारखंडमधील अनेक जिल्ह्यातून विद्यार्थी आणि माफियांना अटक करण्यात आली. शुक्रवारी पोलिसांनी 4 आरोपींना न्यायालयात हजर केलं. आयुष कुमार, सिकंदर यादव, नितीश कुमार आणि अनुराग यादव हे प्रमुख भूमिकेत असून ते तपास पथकाच्या ताब्यात आहेत.

सिकंदर यादव पेपर लीकचा मास्टरमाइंड : अनुराग यादव हा पेपर लीकचा मास्टरमाईंड सिकंदरचा भाचा आहे. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका पुरवल्याची कबुली त्यानं चौकशीदरम्यान दिली आहे. सिकंदर यादव हा दानापूर नगरपरिषदेत कनिष्ठ अभियंता आहे. त्यानंच पेपर फुटीचा प्रकार घडवला. पोलिसांच्या चौकशीत सिकंदरनं पेपर लीक केल्याची कबुली दिली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा

  1. अरविंद केजरीवाल यांची आज तिहार तुरुंगातून सुटका होणार की नाही? ईडी जामिनाच्या निर्णयाला आव्हान देण्याची शक्यता - Delhi Liquor Policy Case
  2. सात वेळचे खासदार भर्त्रीहरी महताब लोकसभेचे हंगामी अध्यक्ष; राष्ट्रपतींनी केली नियुक्ती - Pro Tem Speaker Of Lok Sabha
  3. बिहारमध्ये नीटचा पेपर कसा फुटला? गेस्ट हाऊसमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वीच मिळाली होती उत्तरे - NEET UG Paper Leak 2024

Last Updated : Jun 22, 2024, 12:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.