नवी दिल्ली NEET Paper Leak Case : NEET पेपर लीकवर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. सरन्यायाधीशांच्या खंडपीठानं पुन्हा परीक्षा घेतली जाणार नाही, असं म्हटलं आहे. परीक्षेचं पावित्र्य भंग झाल्याचे दाखवण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.
40 हून अधिक यांचिकांवर सुनावणी : कालच सुप्रीम कोर्टात NEET UG परीक्षा 2024 रद्द करणं आणि कथित हेराफेरीबाबत दाखल करण्यात आलेल्या 40 हून अधिक याचिकांवर सुनावणी झाली. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान, सरन्यायाधीशांनी NTA आणि केंद्राला अनेक प्रश्न विचारले. यापूर्वी, सर्वोच्च न्यायालयानं NTA ला शनिवारपर्यंत वेबसाइटवर शहर आणि केंद्रनिहाय NEET निकाल अपलोड करण्याचे निर्देश दिले होते.
सरन्यायाधीशांकडून प्रश्नांची सरबत्ती : या खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी अनेक महत्त्वाचे प्रश्न विचारले. यामध्ये त्यांनी प्रामुख्याने म्हटलं की, NEET UG ची प्रश्नपत्रिका 4 मे पूर्वी लीक झाल्याचं दिसते. त्याचवेळी हरियाणातील एका परीक्षा केंद्रावर कथित चुकीची प्रश्नपत्रिका दिल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. विद्यार्थ्यांना चुकीच्या प्रश्नपत्रिकेची उत्तरं कशी दिली जातात, असा सवाल त्यांनी केला. तसंच याचिकाकर्त्यांच्या वकिलांना पेपर लीक व्यापक असल्याचं सिद्ध करण्यासाठी डाटा दाखवण्यासही सरन्यायाधीशांनी सांगितलं. यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी काही केंद्रांमध्ये प्रश्नपत्रिकांच्या चुकीच्या वितरणाबाबत NTA ला अनेक प्रश्न विचारले. किती केंद्रांवर चुकीचे प्रश्न वाटण्यात आले? आणि कॅनरा बँकेतील प्रश्नपत्रिकेच्या आधारे किती विद्यार्थ्यांचं मूल्यमापन झालं? NTA नं कॅनरा बँकेतील प्रश्नपत्रिकेची उत्तर पत्रिका जाहीर का केली नाही? झज्जरमधील शहर समन्वयक प्रश्नपत्रिका घेण्यासाठी एसबीआय आणि कॅनरा बँकेत का गेले?, असेही प्रश्न सरन्यायाधीशांनी विचारले होते.
हेही वाचा :