ETV Bharat / bharat

राष्ट्रीय बालिका दिन 2024; जाणून घ्या, कधी आणि कशी झाली सुरुवात?

National Girl Child Day 2024 : दरवर्षी 24 जानेवारी हा राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. याचा उद्देश लोकांना असमानता आणि त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणं हा आहे. तर राष्ट्रीय बालिका दिनाची सुरुवात कशी झाली ते जाणून घ्या.

National Girl Child Day 2024
राष्ट्रीय बालिका दिन 2024
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 23, 2024, 11:35 AM IST

हैदराबाद : भारतात दरवर्षी 24 जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश मुलींना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे हा आहे. याची सुरुवात भारत सरकारनं 2008 मध्ये केली होती.

राष्ट्रीय बालिका दिनाचा इतिहास : इंदिरा गांधी यांनी 24 जानेवारी 1966 रोजी महिला पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यामुळे 24 जानेवारी हा दिवस भारतात राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात राष्ट्रीय बालिका दिन साजरा करणं 2008 मध्ये महिला कल्याण आणि बाल विकास मंत्रालयानं सुरू केले. कारण भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच एक महिला देशाची पंतप्रधान बनली होती. हे महिला सशक्तीकरणाच्या दिशेनं एक पाऊल होते.

  • 24 जानेवारीला बालिका दिन का साजरा केला जातो? दरवर्षी 24 जानेवारीला बालिका दिन साजरा करण्याचं सर्वात मोठे कारण भारताच्या पहिल्या पंतप्रधान झालेल्या इंदिरा गांधी यांच्याशी संबंधित आहे. भारतासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब होती. 24 जानेवारी हा दिवस भारताच्या इतिहासातील आणि महिला सशक्तीकरणासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे.

बालिका दिन साजरा करण्याचा उद्देश : आपल्या देशात मुलींना मुलांपेक्षा कमी समजले जाते. त्यांना अभ्यासाची संधी मिळत नाही. वेळेपूर्वी लग्न करून मुलाची जबाबदारी त्यांच्यावर टाकली जाते. त्यांना त्यांच्या सन्मानासाठी आणि हक्कांसाठीही संघर्ष करावा लागतो. त्यामुळे या दिवशी मुलींसोबतच समाजातही प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला जातो. दरवर्षी या दिवशी देशातील राज्य सरकार आपापल्या राज्यात अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतात.

राष्ट्रीय बालिका दिनाचे महत्व : आज देशात मुली प्रत्येक क्षेत्रात आपला झेंडा फडकावत आहेत. स्त्री-पुरुष असमानता हे भारतीय समाजात आजच नाही तर फार पूर्वीपासून एक मोठे आव्हान आहे. महिलांवरील भेदभावाची ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि सामाजिक स्तरावर मुलींची स्थिती सुधारण्याच्या उद्देशाने भारत सरकारनं अनेक महत्त्वाची पावले उचलली आहेत. त्यात 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' अभियान, 'सुकन्या समृद्धी योजना', 'बेटी बचाओ बेटी पढाओ मोहीम, 'सुकन्या समृद्धी योजना', मोफत किंवा अनुदानित शिक्षण, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये जागांचे आरक्षण यांचा समावेश आहे. भारतात राष्ट्रीय बालिका दिन 24 जानेवारी आणि 11 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो.

हेही वाचा :

  1. मिरारोडमध्ये तणावपूर्व शांतता; दोन गटातील वादानंतर तगडा बंदोबस्त, अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पोलिसांचं आवाहन
  2. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची आज जयंती, हिंदुत्वाची पताका फडकवत ठेवणारा बुलंद आवाज!
  3. मीरा-भाईंदरमधील राड्याची देवेंद्र फडणवीसांकडून दखल, 13 जणांना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.