नवी दिल्ली PM Narendra Modi Oath Ceremony : एनडीएच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी शुक्रवारी संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत सरकार स्थापनेचा दावा केला होता. यापूर्वी मोदींनी भारतरत्न तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची त्यांचा घरी जाऊन भेट घेतली.
नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा निवड : नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्यास सज्ज झाले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना रविवारी शपथविधी सोहळ्यात पंतप्रधानपदाची शपथ घेण्यासाठी औपचारिक आमंत्रण दिलंय. रविवारी ९ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे. गुरुवारी एनडीए नेत्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला होता. त्यानंतर राष्ट्रपतींनी नरेंद्र मोदींना आमंत्रण देऊन त्यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींची नियुक्ती केली.
9 जूनला घेणार शपथ : लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं (NDA) आता सरकार स्थापनेसाठी वेग धरलाय. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत सरकार स्थापनेचा दावा केला आणि सर्व समर्थक खासदारांची यादीही राष्ट्रपतींना सादर केली. यानंतर राष्ट्रपतींनी त्यांना सरकार स्थापनेचं निमंत्रण दिलय. यानंतर आता नरेंद्र मोदी 9 जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.
अडवाणी आणि मुरली मनोहर जोशींची घेतली भेट : पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज एनडीएच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदी तिसऱ्यांदा निवड झाली. यासह मोदी सलग तीनवेळा पंतप्रधान होणारे देशाचे दुसरे नेते ठरणार आहेत. यापूर्वी हा विक्रम पंडित जवाहरलाल नेहरुंच्या नावावर होता. नरेंद्र मोदी हे वेळोवेळी अडवाणी आणि जोशींना भेटायला जातात. यापूर्वी अडवाणींना भारतरत्न देण्यात आला तेव्हाही मोदी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. 96 वर्षीय अडवाणी हे भाजपाचे संस्थापक सदस्य आहेत. अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये ते उपपंतप्रधानही राहिले आहेत. तर 90 वर्षीय मुरली मनोहर जोशी हे देखील भाजपाचे संस्थापक सदस्य आहेत. अडवाणी आणि जोशी हे रामजन्मभूमी आंदोलनातील प्रमुख नेते आहेत. तसंच जोशी यांनी 1991 ते 1993 दरम्यान पक्षाचे अध्यक्षपद भूषवले. 2014 आणि 2019 मध्येही पंतप्रधान झाल्यानंतर मोदी अडवाणींना भेटायला गेले होते.
राज्याला अनेक मंत्रिपदांची आशा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारच्या मंत्रीमंडळात महाराष्ट्राला मोठ्या संख्येनं मंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहे. राज्यात भाजपाचे नऊ खासदार निवडून आले असून त्यापैकी चार ते पाच खासदारांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेना शिंदे गटाला आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला लॉटरी लागण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केंद्रात तीन ते चार मंत्रिपदं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक ते दोन मंत्रिपदं मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे 7 खासदार निवडून आले आहेत. दुसरीकडे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लोकसभेत सुनील तटकरेंच्या रुपात एक जागा मिळाली आहे. त्यांनाही मंत्रीपद मिळू शकतं.
हेही वाचा :
- 'मैं उस माटी का वृक्ष नहीं, जिसको नदियों ने सींचा है,..'; पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी मुख्यमंत्री शिंदेंची कविता, दिला जाहीर पाठिंबा - NDA Meeting
- १० वर्षानंतरही काँग्रेस १०० चा आकडा गाठू शकलं नाही-पंतप्रधान नरेंद्र मोदी - NDA gov formation
- उद्धव ठाकरेंची मनधरणी करण्याचे भाजपाचे प्रयत्न; शिवसेनेचे सहा आमदार करणार घरवापसी? - Lok Sabha Election Results 2024