ETV Bharat / bharat

पालकांच्या भांडणामुळ 4 मुलाचं मुंबईतून पलायन, 6 दिवसानंतरही मुलं बेपत्ता; मुलांना बाल निकेतनमध्ये सोडल्याचा ऑटोचालकाचा दावा - Four children Missing

Four children Missing : मुंबईतील अंधेरी पश्चिमध्ये राहणाऱ्या एकाच कुटुंबातील चार मुलांनी पालकांना न सांगता रेल्वेनं ग्वाल्हेर गाठलंय. आता मुंबई पोलीसही त्या मुलांच्या शोधात ग्वाल्हेरमध्ये पोहोचले आहेत, मात्र मुलांचा शोध लागलेला नाहीय. त्यामुळं माधव बाल निकेतन आश्रम चौकशीच्या जाळ्यात सापडलंय. अखेर मुलं कुठं गायब झाली? याबाबत तपास सुरू आहे.

Madhav Bal Niketan Ashram
माधव बाल निकेतन आश्रम (ETV Bharat National Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 2, 2024, 10:45 PM IST

ग्वाल्हेर Four children Missing : मुंबईतून बेपत्ता झालेल्या एकाच कुटुंबातील चार मुलांच्या शोधात मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस रविवारी ग्वाल्हेरमध्ये पोहोचले. पोलिसांना ज्या आश्रमात मुलं असल्याचा संशय होता, त्या आश्रमात ही मुलं सापडली नाही. यामुळं आश्रम व्यवस्थापनही अडचणीत आलं आहे.

विपेंद्र चौहान यांची प्रतिक्रिया (ETV BHART National Desk)

चारही मुलं पोहोचली माधव बाल निकेतन आश्रमात : मुंबईच्या अंधेरी पूर्व पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील ही चारही मुलं ट्रेननं ग्वाल्हेरला पोहोचली होती. ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या मुरैना येथील एका तरुणाच्या सांगण्यावरून सर्व मुलं ग्वाल्हेर स्टेशनवर उतरली. यानंतर स्थानकाबाहेरील ऑटोचालक दिलीप धाकड यांच्या मदतीनं मुलांनी लक्ष्मीगंज रोडवरील माधव बाल निकेतन गाठलं. चार मुलं माधव बाल निकेतन येथील व्यवस्थापनाकडं सुपूर्द केल्याचा दावा ऑटोचालक दिलीप धाकड यांनी केला आहे. यामध्ये तीन मुलीसह एक मुलाचा समावेश आहे.

आश्रम व्यवस्थापनानं माहिती लपवली : या मुलांच्या शोधात मुंबई पोलीस रविवारी माधव बाल निकेतनमध्ये पोहोचले असता, तिथं मुलं आढळून आली नाहीत. पोलीस, आरपीएफ किंवा न्यायालयाच्या सूचनेनुसार निराधारांना माधव बाल निकेतनमध्ये ठेवलं जातं. ही मुलं थेट माधव बाल निकेतन आश्रममध्ये आल्यानंतर व्यवस्थापनानं महिला, बालविकास विभाग, चाइल्ड हेल्पलाइनसह पोलिसांना याची माहिती द्यायला हवी होती, मात्र निकेतन व्यवस्थापनानं पोलिसांना कोणतीही माहिती दिली नाही. लहान मुलांसारख्या संवेदनशील प्रकरणात आश्रम व्यावस्थापनाचा निष्काळजीपणा दिसून येत आहे. माधव बाल निकेतन व्यवस्थापन ही मुलं इथं राहत नसल्याचं पोलिसांना सांगितलंय. मात्र जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही मुलं ऑटोनं आश्रमात येताना दिसल्याची चर्चा आहे. सीसीटीव्ही फुटेज पोलीस कर्मचाऱ्याकडं उपलब्ध आहेत.

आई-वडिलांमधील भांडणामुळं मुलं त्रस्त : अंधेरी पश्चिम येथे राहणाऱ्या एकाच कुटुंबातील ही मुलं त्यांच्या पालकांमधील रोजच्या भांडणामुळं त्रस्त असल्याची माहिती मिळालीय. त्यामुळंच ते न सांगता घराबाहेर पडले. त्यानंतर ते दिल्लीच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढले. ट्रेनमध्ये प्रवास करत असताना त्यांना मुरैना येथील एक तरुण भेटला. या मुलांना पेटीएमच्या बदल्यात त्यानं काही रोख रक्कमही दिली. त्यामुळं या मुलांनी माधव बाल निकेतन गाठलं. ही मुलं आता कुठे आहेत? याबाबत कोणालाच माहिती नाही. यातील सर्वात मोठी मुलगी 18 वर्षांची आहे. तिला दोन लहान बहिणी असून सर्वात धाकटा एक भाऊ आहे.

हे वाचलंत का :

  1. VIDEO : नावाजलेल्या 'मॉन्जिनीज' केकमध्ये आढळले केस; पालघरमधील प्रकार, FDA कडून दखल - Hair Found in Cake
  2. मध्य रेल्वेचा विशेष ब्लॉक संपला; तीन दिवसांच्या ब्लॉकमधून प्रवाशांना काय मिळालं? - Central Railway Block Ends
  3. पुणे कार अपघात प्रकरण; बदललेले 'ते' रक्ताचे नमुने आरोपीच्या आईचे - Pune Porsche Accident Case

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.