जयपूर Fraud By Posing As A Girl : मुंबईतील उच्च पदस्थ अधिकाऱ्याला ड्रिमगर्ल चित्रपटातील अभिनेत्रीसारखं मधाळ बोलण्यात गुंतवून ठेवत अलवरच्या तरुणानं ब्लॅकमेल केलं. या तरुणानं मुंबईतील उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या अश्लिल बोलण्याची ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डींग करुन त्यांना ब्लॅकमेल केलं. इतकंच नाही, तर त्यांच्याकडून बळजबरीनं त्याच्या खात्यात 50 हजार रुपये टाकायला भाग पाडलं. अखेर ब्लॅकमेलींगला कंटाळलेल्या या उच्चपदस्थ अधिकाऱ्यानं मुंबई पोलिसांकडं धाव घेतली. त्यामुळे मुंबई पोलिसांनी राजस्थान पोलिसांच्या मदतीनं दानापूर गावातून या ब्लॅकमेलरच्या मुसक्या आवळल्या. आशिष स्वामी असं मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या भामट्याचं नाव आहे.
ड्रिमगर्ल चित्रपटागत केली फसवणूक : अलवर इथल्या आशिष स्वामी यानं मुंबईतील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याला मुलीच्या आवाजात बोलून त्यांचा विश्वास संपादन केला. यानंतर या भामट्यानं ड्रिमगर्ल चित्रपटात झालेल्या फसवणुकीचा प्रकार अवलंबला. त्यानं फोनवर मधाळ बोलत या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला भुलवलं. त्यानंतर त्यांच्याशी अश्लिल संवाद करत त्याचं रेकॉर्डींग केलं. त्यांचे अश्लिल व्हिडिओही तयार केले. त्यानंतर त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली.
अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी : या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला फोनवर बोललेल्या अश्लिल संवादाचे रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देत त्यांना आशिष स्वामीनं ब्लॅकमेल केलं. त्यांच्याकडून बळजबरीनं 50 हजार रुपये त्याच्या खात्यात पाठवण्यास भाग पाडलं. त्यानंतरही तो भामटा या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करत होता. त्यामुळे ब्लॅकमेलिंगला कंटाळून या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांकडं धाव घेतली.
मुंबई पोलिसांनी भामट्याला ठोकल्या अलवरमधून बेड्या : मुंबईतील उच्चपदस्थ अधिकाऱ्याला भामटा ब्लॅकमेल करत असल्याची तक्रार दाखल होता, मुंबई पोलिसांनी कसून तपास सुरू केला. हा भामटा या उच्चपदस्थ अधिकाऱ्याला राजस्थानमधील अलवर इथून ब्लॅकमेल करत असल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे मुंबई पोलिसांनी राजस्थानातील अलवर गाठत तिथल्या पोलिसांनी मदत घेतली. यावेळी पोलिसांनी रैनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या दानपुरा गावातून ब्लॅकमेलर आशिष स्वामी याला बेड्या ठोकल्या. त्याच्या चौकशीत अनेक खुलासे होण्याची शक्यता आहे. पोलिसांना त्याच्या मोबाईलमधून अनेक महत्वाची माहिती आणि व्हिडिओ मिळाले आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
हेही वाचा :
- काय सांगता ! सीबीआयच्या डीएसपीचे २ लाख रुपये सायबर गुन्हेगारांनी लुटले, फसवणुकीची तऱ्हा 'कशी' ठरली निराळी - cyber fraud
- nude video call on WhatsApp: व्हॉट्सअपवर नग्न व्हिडिओ कॉल पडला महागात, ब्लॅकमेल करुन इंजिनिअरला २५ लाखांना लुबाडले
- Cyber fraud with High Court Chief Justice : कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची सायबर फसवणूक; जामतारा येथून 4 गुन्हेगारांना अटक