ETV Bharat / bharat

कार आणि ट्रकची भीषण धडक : अहमदाबाद इंदूर महामार्गावर 8 प्रवाशांचा मृत्यू - MP Dhar Road Accident - MP DHAR ROAD ACCIDENT

MP Dhar Road Accident : इंदूर अहमदाबाद महामार्गावर ट्रकवर कार आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल 8 प्रवाशांचा मृत्यू झाला. ही कार पोलीस शिपाई चालवत असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे.

MP Dhar Road Accident
संपादित छायाचित्र (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 16, 2024, 8:11 AM IST

भोपाळ MP Dhar Road Accident : कारचा टायर फुटल्यानं भरधाव कार उभ्या ट्रकवर आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल 8 जणांचा जागीच मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना इंदूर अहमदाबाद महामार्गावर धार इथं घडली. या अपघातात एक जण गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.

टायर फुटल्यानं उभ्या ट्रकवर आदळली कार : इंदूर अहमदाबाद महामार्गावर धार इथं भरधाव वेगातील कार उभ्या ट्रकवर जाऊन आदळली. या भीषण अपघातात भरधाव कारमधील 8 जण जागीच ठार झाले. तर कारमधील एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. घटनेची माहिती मिळाताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी बचावकार्य सुरू केले. मात्र अपघातातील 8 जण जागीच ठार झाल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. अपघातग्रस्त कारचा टायर फुटल्यानं हा अपघात झाल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली.

पोलीस शिपाई चालवत होता कार : इंदूर-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात झाल्याची माहिती 100 क्रमांकावर देण्यात आली होती. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी बेटमा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धारजवळ हा भीषण अपघात घडल्याचं दिसून आलं. गुना इथले काही नागरिक धार जिल्ह्यातील बाग तांडा येथून येत होते. यावेळी इंदूर-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घाटबिलोड बायपास इथं भरधाव कार रस्त्यावरील उभ्या ट्रकला धडकली. या भीषण अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील 1 जण गंभीर जखमी झाला. कारमधील मृतांमध्ये एका महिलेचाही समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही कार पोलीस शिपाई चालवत असल्याची प्राथमिक माहिती पुढं आली असून त्यांचाही मृत्यू झाला आहे. या पोलीस शिपायाची नियुक्ती गुना इथ करण्यात आली होती, अशी प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली. या भीषण अपघाताचा पुढील तपास बेटमा पोलीस स्टेशनचे कर्मचारी करत आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

हेही वाचा :

  1. एसटी बस आणि कारची भीषण धडक: अपघातात तीन जणांचा मृत्यू, दोन वर्षीय बालक गंभीर - Nashik Road Accident
  2. टायर फुटल्यानंतर डिव्हायडर तोडून ट्रकला धडकली कार; भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू - Hapur Road Accident
  3. मतदान करुन परतणाऱ्या 6 प्रवाशांवर काळाचा घाला ; टिप्पर आणि खासगी बसच्या भीषण अपघातात बस पेटल्यानं होरपळून मृत्यू - Palnadu Road Accident

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.