हैदराबाद Mother Appeals Jaishankar : तेलंगणातील एका महिलेनं सौदी अरेबियात अडकलेली तिची मुलगी आणि मुलांना भारतात आणण्याची विनंती केलीय. ही महिला रंगारेड्डी जिल्ह्यातील राजेंद्र नगर येथील रहिवासी आहेत. त्यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि स्थानिक नेते अमजेदुल्ला खान यांना भावनिक आवाहन केलंय. या महिलेनं तिच्या मुलीची वाईट स्थिती असलेला एक फोटोदेखील शेअर केलाय. या फोटोत तिच्या हात आणि कानातून रक्तस्त्राव होत असल्याचं दिसत आहे. त्यांनी परराष्ट्र मंत्री जयशंकर यांना हस्तक्षेप करण्याचं आवाहन केलंय. मुलीला भारतात परत आणण्याची विनंती केलीय.
बांगलादेशी नागरिकाशी केलं लग्न : या महिलेनं सांगितलं की, तिची मुलगी आणि तीन मुलं सौदीमध्ये अडकली आहे. त्यांची प्रकृती वाईट आहे. हुंड्यामुळं पतीनं तिला घटस्फोट दिल्याचा दावा केलाय. मात्र, त्यांची तीन मुलं तिथंच अडकली आहेत. मक्का शहरात ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या बांगलादेशी नागरिक अली हुसैन अजीजुल रहमानसोबत तिच्या मुलीचा विवाह झाला होता. लग्नानंतर काही वर्षानंतर अलीहुसैननं मुलीला त्रास देण्यास सुरुवात केली. तिला घराबाहेर जाण्यास मनाई केली. तो तिला आईशी बोलू देत नव्हता. या मुलीच्या आईनं तक्रार केली की, तिनं त्याला विचारलं तर तो तिला धमकावत असे. अलीहुसैननं अलीकडे बांगलादेशातून 17 वर्षीय तरुणीला 20 हजार रियालमध्ये विकत घेऊन तिच्याशी लग्न केले. त्यानं तिला तीन महिन्यांच्या व्हिसावर आणले. तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. माहिती बाहेर येऊ नये म्हणून तो दोन बायका आणि मुलांना घरात कोंडून ठेवायचा. त्यांना त्रास द्यायचा. महिलेनं परराष्ट्रमंत्र्यांकडे दाद मागत सांगितलं की, तिच्या मुलीचा पती मुलीला नेहमी मारहाण करत असे. इतकंच नाही तर बोलण्यावरही बंदी असून तिला शारीरिक इजाही झालीय. अलीकडेच तिला तिच्या पतीनं सोडून दिलं. त्यानं दुसरं लग्न केलंय.
नवऱ्याच्या जाचातून सुटून जेद्दाहला पोहोचली : या महिलेच्या मुलीला पतीनं दुसरं लग्न केल्याचं समजलं. पतीनं दोन्ही पत्नी आणि त्यांच्या मुलांवर अत्याचार केला आहे. भारतात राहणाऱ्या आईला याची माहिती कळली. तोपर्यंत तिची मुलगी आणि मुलं बांगलादेशी नागरिकाच्या जाचातून सुटून जेद्दाहला पोहोचली.
हेही वाचा :