ETV Bharat / bharat

गळ्यात अडकलं लॉकेट, डॉक्टरांनी ऑपरेशन करुन दिलं चिमुकलीला जीवनदान - Gold news - GOLD NEWS

Gold Locket Stuck In The Child Neck बालोत्रा ​​येथील गुडामलानी येथे चिमुकल्या बाळानं सोन्याचं लॉकेट गिळलं. लॉकेट बाळाच्या फूड पाईपमधून गेलं आणि छातीजवळ अडकलं. बाळाच्या कुटुंबीयांनी बाळाला तत्काळ रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनीगळ्यातील सोन्याचं लॉकेट काढलं. वाचा सविस्तर..

Doctor
डॉक्टरांनी दिलं बाळाला जिवनदान (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 3, 2024, 4:41 PM IST

हैदराबाद Gold Locket Stuck In The Child Neck: डॉक्टरांना देवाचा दर्जा दिला जातो. कारण डॉक्टरच मनुष्याला मृत्यूच्या दारातून परत आणू शकतो आणि जीवनदान देऊ शकतो. जगात अशी अनेक उदाहरणं आहेत. याचं ताज उदाहरण राजस्थानमधील बालोत्रा जिल्ह्यात समोर आलं आहे. डॉक्टरांनी चार महिन्याच्या बाळानं गिळलेलं सोन्याचं लॉकेट काढून बाळाला नवजीवन दिलं आहे. याबाबत रुग्णालयाचा ऑपरेशन थिएटरचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. ज्यामध्ये डॉक्टरांची संपूर्ण टीम बाळाच्या गळ्यातील सोन्याचं लॉकेट काढताना दिसत आहे. यात डॉक्टरांना यश आलं, चार महिन्याच्या निरागस बाळाला जीवनदान मिळालं. कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांनी डॉ.जी.आर.भेल आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार मानले.

काय घडलं : गुडामलानी परिसरातील आजी आपल्या ४ महिन्यांची नात अर्पिताला आपल्या मांडीवर घेऊन बसली होती. आजीच्या मांडीवर खेळत असतानाच बाळानं सोन्याचं लॉकेट गिळलं. लॉकेट बाळाच्या फूड पाईपमधून गेलं आणि छातीजवळ अडकलं. काही वेळातच श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. निरागस बाळाची प्रकृती बिघडत असल्याचं पाहून कुटुंबीयांनी तत्काळ बाळाला बालोत्रा ​येथील खासगी रुग्णालयात नेलं. येथे डॉ. जी. आर. भिल आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं बाळाच्या गळ्यातील सोन्याचं लॉकेट काढून जीवनदान दिलं.

डॉक्टर काय म्हणाले: श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं कुटुंबीयांनी बाळाला आणल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. बाळाची अवस्था बघून बाळाचे प्रथम एक्स-रे काढण्यात आले. त्यात बाळाच्या घशाखालील अन्न न लिकेत लॉकेट अडकल्याचं उघड झालं. हे कळताच आमच्या संपूर्ण टीमने मुलीला ऑपरेशन थिएटरमध्ये हलवलं. त्यानंतर तिला भूल देण्या आली. किरकोळ ऑपरेशन करून एन्डोस्कोपीच्या मदतीनं तिच्या गळ्यातील सोन्याचं लॉकेट काढण्यात आलं. सध्या बाळ पूर्णपणे बरं असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

हेही वाचा

  1. तोंडाने श्वास देत नवजात बाळाचे महिला डॉक्टरने वाचवले प्राण; व्हिडिओ होतोय व्हायरल
  2. Baby With Two Noses : आश्चर्यच! गुजरातमध्ये चक्क दोन नाक असलेल्या बाळाचा जन्म!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.